Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Ranbir Kapoor: 250 रुपयांपासून करिअरची सुरुवात, आज एका सिनेमासाठी घेतो एवढे कोटी रुपये

बॉलीवूड रॉकस्टार रणबीर कपूर आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलीवूड रॉकस्टार रणबीर कपूर आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. २८ सप्टेंबर १९८२ साली जन्मलेल्या या ताऱ्याने चंदेरी दुनियेत नाव कमावलं आहे. आज बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. रणबीर कपूरने २००७ साली 'सावरिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच चित्रपटातील अभिनय कौशल्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आजच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचे नाव आहे.

२०१६ पासून रणबीर कपूर मुंबईतील पाली हिल येथील वास्तु अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. ज्याचे इंटीरियर डिझाइन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे. रणबीर कपूरला आलिशान गाड्या आणि महागड्या ब्रँडेड घड्याळांची प्रंचड आवड आहे. रणबीर कपूरकडे रेंज रोव्हर वोग, ऑडी आर8, मर्सिडीज जी 63, रेंज रोव्हर स्पोर्ट अशा आलिशान गाड्या आहेत. माहितीनुसार, रणबीर कपूर एकूण ३४५ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. रणबीरची एका महिन्याची कमाई सुमारे ३ कोटींहून अधिक आहे. तसेच प्रत्येक चित्रपटासाठी रणबीर १८ ते २० कोटी रूपये मानधन घेतो.

सोशल मीडियावर रणबीर जास्त सक्रिय नसतो. मात्र चित्रपटातील अभिनयासोबतच रणबीर अनेक चॅरिटीशी जोडला आहे. रणबीर इंडियन सुपर लीग फुटबॉल संघ मुंबई सिटी एफसीचा सहमालक देखील आहे.

वर्कफ्रंट विषयी बोलायचे तर, रणबीर कपूर आगामी काळात लव रंजनच्या 'अनटाइटल्ड' चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय रणबीर कपूर 'अॅनिमल' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना रणबीरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT