आर्यनच्या अटकेचा शाहरुख खानला धक्का; BYJU's ने बंद केल्या जाहिराती Saam Tv
मनोरंजन बातम्या

आर्यनच्या अटकेचा शाहरुख खानला धक्का; BYJU's ने बंद केल्या जाहिराती

देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी लर्निंग अ‍ॅप बायजूने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई. क्रूज पार्टी ड्रग्ज Drugs Party Case प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानचे Aryan Khan वडील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला Shahrukh Khan यामुळे सुद्धा मोठा फटका बसला आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी लर्निंग अ‍ॅप बायजूने Byju's शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. शाहरुख खान 2017 पासून बायजूचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर Brand Ambassador आहे.

हे देखील पहा-

मीडिया रिपोर्टनुसार, या जाहिरातींसाठी बायजूने शाहरुखसोबत अ‍ॅडव्हान्स बुकिंग Advance Booking केली होती. बुकिंग असूनही बायजूने त्यांच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. किंग खानच्या प्रायोजकत्वाच्या व्यवहारांमध्ये In sponsorship transactions बायजू हा सर्वात मोठा ब्रँड होता. याशिवाय शाहरुख खानकडे हुंदाई Hundai, रिलायन्स जिओ Reliance Jio, एलजी LG, दुबई टुरिझमसारख्या Dubai Tourism कंपन्यांच्या जाहिराती आहेत. अहवालांनुसार, बिजू किंग खानला ब्रँडचे अ‍ॅड करण्यासाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये देते.

गेल्या काही वर्षांत बायजू या स्टार्टअपने चांगलाच व्यवसाय Revenue केला आहे. बायजू कंपनी कडून शाहरुखला त्यांच्या जाहिरातींच्या करारामधून Contract पूर्णपणे हटवलं आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT