Amitabh Bachchan's first look poster from Brahmastra Saam TV
मनोरंजन बातम्या

Brahmastra : महानायक अमिताभ बच्चन यांचा भन्नाट लूक समोर; 'ब्रह्मास्त्र'चा नवा टिझर रीलीज, पाहा Video

Amitabh Bachchan Look In Brahmastra Movie: सोशल मीडियावर काही तासांतच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जींचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) आणि गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधले होते. नुकताच निर्माता करण जोहरने चित्रपटासंबधित (Bollywood Movie) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Amitabh Bachchan's first look poster from Brahmastra)

हे देखील पाहा -

प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'ब्रह्मास्त्र' ची एक छोटीशी झलक शेअर केली आहे 'गुरू आणि त्यांच्या प्रभास्त्रला फक्त ९ दिवसांत भेटा. ९ सप्टेंबरपासून सिनेमागृहात ...अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ तलवार प्रभास्त्राने लढताना दमदार भूमिकेत दिसत आहेत. बिग बींचा हा भन्नाट अवतार चाहत्यांना पंसतीस आला आहे. सोशल मीडियावर काही तासांतच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आपल्या अस्त्राने शत्रूचा विनाश करताना दिसत आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. रणबीर कपूर, अलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटात अमिताभ बच्चन रणबीरच्या गुरूंची अरविंद चतुर्वेदीची भूमिका साकारणार आहेत. अभिनेता नागार्जुनने पुरातत्व शास्त्रज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. तर मौनी रॉय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अमिताभ बच्चन यांचा 'उंचाई' हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन रश्मिका मंदान्नासोबत 'गुडबाय' आणि 'प्रभास' आणि क्रिती सेननसोबत 'प्रोजेक्ट के' मध्ये दिसणार आहेत. मागील काही दिवसांत बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले आहेत.परंतु अमिताभ बच्चन यांचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट काय जादू करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT