Kantara Chapter 1  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; पार केला ४०० कोटींचा टप्पा

Box Office Collection Report: सध्या बॉक्स ऑफिसवर दोन वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट जोरदार सुरु आहेत. ‘कांतारा: चॅप्टर १’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’.

Shruti Vilas Kadam

Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर दोन वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट जोरदार सुरु आहेत. ‘कांतारा: चॅप्टर १’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’. एकीकडे दक्षिणेतील लोककथा आणि अध्यात्माचा संगम असलेला कांतारा, तर दुसरीकडे बॉलिवूडचा हलकाफुलका रोमँटिक मसाला असलेला सनी संस्कारी की तुलसी कुमारी दोन्ही चित्रपटांनी आपल्या कथानक आणि स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. तर जाणून घेऊयात या चित्रपटांनी किती कमाई केली.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत तब्बल 400 कोटींची जागतिक कमाई केली आहे. त्यापैकी केवळ भारतातच चित्रपटाने 290 कोटींची कमाई केली आहे. दक्षिण भारतात चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, उत्तर भारत आणि महाराष्ट्रातही या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत. स्थानिक संस्कृती, अध्यात्मिकता आणि रहस्य यांचा संगम असलेल्या या कथानकाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

दरम्यान, करण जौहर निर्मित आणि वरुण धवन–जान्हवी कपूर अभिनित ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने भारतात 44 कोटींची कमाई तर जगभरात एकूण 64.81 कोटींचा ग्रॉस आकडा पार केला आहे. चित्रपटातील गाणी, विनोद आणि कलाकारांची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे.

दोन्ही चित्रपटांची कमाई जरी भिन्न असली तरी दोन्ही सिनेमांनी आपापल्या प्रेक्षकवर्गाला खिळवून ठेवले आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’ने प्रादेशिक सिनेमा किती प्रभावी ठरू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध केले, तर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ने बॉलिवूडच्या कौटुंबिक मनोरंजनाची परंपरा पुढे नेली आहे. पुढील काही दिवसांत ‘कांतारा: चॅप्टर १’ 450 कोटींच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा आहे, तर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ लवकरच 70 कोटींचा आकडा पार करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT