Bigg Boss Mid-Week Eviction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Mid-Week Eviction: बिग बॉसच्या घरात होणार मिड वीक एव्हिक्शन; निक्कीला बसलाय धक्का, Video पाहा

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या जबरदस्त चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या १०० दिवसांचा खेळ ७० दिवसांत संपायला आता काही दिवस बाकी आहेत. अश्या बिग बॉसच्या घरात कोण विजयी होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच बिग बॉसच्या रोजच्या खेळीत नवनवीन बदल होताना दिसत आहे. अशातच आज बिग बॉसच्या घरात मिड वीक इविक्शन होणार आहे याचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आज भारतातील नावाजलेला डीजे आणि संगीत निर्माता DJ Kratex येणार आहे. DJ Kratex आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं मनोरंजन करणार आहे. लेटेस्ट प्रोमोमध्ये, आज मिड वीक इविक्शन देखील होणार असल्याचंही बिग बॉस सांगत आहेत. गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला तेव्हा बिग बॉसने घोषणा केली होती की, या आठवड्यात मिड वीक एलिमिनेशन होणार आहे. आजच्या मिड वीक इविक्शन कोणत्या स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल.

बिग बॉस मराठी सीझन 5 चा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. 6 ऑक्टोबरला यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे सदस्य आहेत. यंदाच्या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ग्रँड फिनाले ट्रॉफी कुणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

Marathi News Live Updates : रत्नागिरीतील महिलांना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मोबाईल

Abdul Sattar News : पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार? VIDEO

Maharashtra Politics: अजित पवार गटाला 40 जागा, शिंदे - भाजप किती जागांवर लढवणार निवडणूक? काय आहे अमित शहांचा फॉर्म्युला? वाचा...

SCROLL FOR NEXT