Dharmendra Social Media Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmendra Post: ‘अच्छा तो हम चलते हैं...’, धर्मेंद्र यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते चिंतेत

Dharmendra Social Media Post: सध्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची ही पोस्ट पाहून धर्मेंद्र यांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.

Chetan Bodke

Dharmendra Social Media Post

८० आणि ९०च्या दशकातील बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र कायमच आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित चाहत्यांना अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. सध्या धर्मेंद्र यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नुकतंच धर्मेंद्र यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. सध्या त्या पोस्टमुळे धर्मेंद्र चर्चेत आले आहेत. त्यांची ही पोस्ट पाहून धर्मेंद्र यांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. (Bollywood)

धर्मेंद्र यांनी काल पहाटे त्यांच्या एक्स अकाऊंटवर त्यांच्याच चित्रपटातला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, ते एका झाडा खाली उभे असलेले दिसत आहेत. त्यांचा हा फोटो तरूण वयातला आहे. त्यांच्या पाठीमागे एक अभिनेत्री बसलेली दिसत आहे. पण नेमकी ती अभिनेत्री कोण आहे? हे स्पष्ट होत नाही. हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी 'अच्छा तो हम चलते हैं' असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकजण कमेंट करत त्यांच्या प्रकृतीची विचारणा करत आहेत. (Bollywood Actor)

गेल्या काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी पोस्ट शेअर केली होती. 'गालियाँ होवन सुन्नियों। ,,,,,, जत्थे मिर्ज़ा यार फिरे ,,,,,,' धर्मेंद्र पाजी असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली होती. तर सोबतच धर्मेंद्र यांनी आपल्या एका जुन्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शन लिहिले की, 'गुनाह बख्श दे अब और सजा ना दे. हम टूट चले, अब और इम्तिहान ना ले. तेरे रहम ओ करम पे हैं. तेरे रहम ओ करम बना रहे!' असं कॅप्शन दिलं होतं. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला आहे. (Bollywood Film)

अभिनेते धर्मेंद्र आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. काही वर्षांचा ब्रेक घेत धर्मेंद्र यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी पुन्हा दमदार कमबॅक केले आहे. धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटातल्या धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनमुळे त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'तेरे बातों मै ऐसा उल्झा जियाँ' या चित्रपटामध्येही धर्मेंद्र यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच 'अपने २' मध्येही ते दिसणार आहेत. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT