Kuttey Trailer Out, Bollywood news in Marathi INSTAGRAM/@arjunkapoor
मनोरंजन बातम्या

Kuttey Trailer: 'शिकार बनो या शिकार करो...' अर्जुन कपूरच्या 'कुत्ते' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दमदार संवाद आणि दिग्गज कलाकार यांच्यासह डार्क ह्युमर असलेला 'कुत्ते'च्या ट्रेलरचा धुमाकूळ.

Pooja Dange

Kuttey Trailer Out: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अर्जुनच्या 'कुत्ते' चित्रपटाची स्टार कास्ट सुद्धा तगडी आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करून चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केला होता. नुकताच 'कुत्ते' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून हा चित्रपट मनोरंजन, थरार, आणि डार्क ह्यूमरने भरलेला आहे. चित्रपटाचा ट्रेलरच धमाकेदार आहे. (Kuttey Trailer Out)

'जंगल का एक उसूल सुन….या तो शिकार बनो या शिकार करो….' 'कुत्ते' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात या वाक्याने होते. ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर जंगलात आहे आणि त्याला अनेक लोकांनी घेरले आहे. अर्जुनने पाच बोलताच सर्वांना त्यांच्या बंदुका फेकून द्यायच्या असतात. परंतु अर्जुन वगळता कोणीच बंदूक फेकत नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, चांगल्याची दुनियाच राहिली नाही. तुम्ही सर्वच्या सर्व 'कुत्ते' आहेत. ट्रेलरमध्ये तब्बू सुद्धा शिव्या देताना दिसत आहे. तर राधिका मदान इंटिमेट सीन्स करताना दिसत आहे. (Trailer)

ट्रेलरची सुरूवात शाहिद कपूरच्या कमीने चित्रपटातील टायटल ट्रॅकने करण्यात आली आहे. विशाल भारद्वाज यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले होते. 'कुत्ते' चित्रपटालाही त्यांनीच संगीत दिले आहे. ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी एक मोठा इव्हेंट करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये दिग्दर्शक भारद्वाज, त्यांचे वडील विशाल भारद्वाज आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. (Bollywood)

चित्रपटामध्ये अर्जुन कपूर, तब्बू आणि नासिरुद्दीन शाह यांच्याव्यतिरिक्त कोंकणा शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज यांचा समावेश आहे. या चित्रपटाला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे. तर गुलजार यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. कुत्ते चित्रपट १३ जानेवारी २०२३ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT