A R Rahman Told Wife To Not Speak in Hindi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

A.R. Rahman Birthday: ए. आर. रहमान यांनी लग्न करण्यास ठेवलेल्या 'या' अटी, विशेष गुण पाहुनच सायरा बानूसोबत केलं होतं लग्न

A.R.Rahman Turns At Age Of 57: आपल्या दमदार आवाजाने जगभरातल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या विश्वविख्यात संगीतकार व गायक ए. आर. रहमानचा आज अर्थात ६ जानेवारी रोजी वाढदिवस.

Chetan Bodke

A.R. Rahman And Saira Banu Wedding

आपल्या दमदार आवाजाने जगभरातल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या विश्वविख्यात संगीतकार व गायक ए. आर. रहमानचा आज अर्थात ६ जानेवारी रोजी वाढदिवस. रहमानचे खासगी आयुष्य जितके चर्चेत होते तितकेच त्याचे लव्हलाईफही रंजक होते. त्याचे पत्नी सायरा बानू हिच्यावर मनापासून प्रेम आहे. त्याने आईला लग्नासाठी काही अटी घालून दिल्या होत्या. दिलेल्या अटींची पूर्तता जी मुलगी करेल तिच्यासोबत तो लग्नगाठ बांधणार होता. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची आणि सायरा बानूच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत.

ए. आर. रहमान आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ए. आर. रहमान आपल्या गाण्यांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फार कमी माहिती आहे. ए.आरने आणि सायराने १९९५ मध्ये सर्वांच्या सहमताने अ‍ॅरेंज मॅरेज केले. त्यावेळी ए.आरचं वय जेमतेम २९ होतं.

दरम्यान, अनेक सेलिब्रिटी असो किंवा गायक असो आपल्याला लव्ह मॅरेज करतानाच दिसतात. पण या गोष्टीला रहमान अपवाद होता. एका मुलाखतीत रहमानने अ‍ॅरेंज मॅरेज का केले? या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझ्याकडे मुलगी शोधायला वेळ नाही. असं म्हणून रहमानने आईकडे मुलगी शोधायची आणि लग्न जुळवण्याची मोठी जबाबदारी मी आईवर सोपवली होती. त्याच दरम्यान रहमानला रोजा, बॉम्बे आणि रंगीला या गाण्यांमुळे खूपच बिझी शेड्युल्ड होता.

ती मुलगी सुशिक्षित असावी, कारण रहमानचं शिक्षण फक्त ग्रॅज्युएशन पर्यंत झाले होते. तिला संगीताची आवड असली पाहिजे आणि ती दिसायलाही सुंदर असावी. अशा अटी रहमानने आपल्या आईला सांगितल्या होत्या. रहमानच्या आईला हे सर्व गुण संपन्न मुलगी शोधणे खूप अवघड होते, कारण तिन्ही गुण एकाच मुलीत मिळणे अशक्य आहे. बराच शोध घेतल्यानंतर रहमानच्या आईने आणि नातेवाईकांनी चेन्नईतील एका व्यावसायिकाच्या घरी मुलाचे स्थळ नेले होते. त्या व्यावसायिकाला दोन मुली होत्या. ज्यांची नावं मेहर आणि सायरा बानो अशी होती.

त्यातच योगायोग असा की, रहमानच्या आईने ते सर्व गुण सायरा बानोमध्ये पाहिले आणि त्यांनी लगेच सायरा बानूला लग्नासाठी होकार दर्शवला. ए. आर. रहमान आणि सायरा यांनी १९९५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या वेळी रहमान २९ वर्षांचे होते, तर सायरा यांचे वय २१ वर्ष होते.

जरीही दोघांचे प्रेमविवाह नसला झाला, तरी दोघांचेही नाते फारच घट्ट आहे. ए. आर. रहमानचे खरे नाव दिलीप कुमार असून तो ए. आर. रहमान या नावानेच जगभर ओळखला जाते. रहमानने धर्मांतर करत नाव बदलले होते.

आपल्या संगीताने चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या रहमानला संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला होता. त्याला संगीताचे धडे बालपणापासूनच वडिलांकडून मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT