Deepika-Ranveer Baby Girl Name SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika-Ranveer Baby Girl Name : 'दीपवीर'च्या चिमुकलीच्या पावलांची झलक, लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सांगितलं लेकीचं नाव

Deepika Padukone-Ranveer Singh : बॉलिवूड पावर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवले आहे. त्यांनी सोशल मिडिया पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर यांच्या घरी लक्ष्मी आली. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले. ८ सप्टेंबर रोजी त्यांना कन्यारत्न पात्र झाले.

आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी आपल्या गोंडस मुलीचे नाव ठेवले आहे. याची खास पोस्ट 'दीपवीर'ने सोशल मीडियावर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दीपिकाने आपल्या चिमुकलीच्या पावलांची झलक दाखवली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे नाव लिहिलं आहे. दीपिका आणि रणवीरने आपल्या गोंडस मुलीचे नाव 'दुआ' (Dua Padukone Singh ) असे ठेवले आहे.

दुआ पदुकोण पोस्ट

"दुआ पादुकोण सिंग

'दुआ' म्हणजे प्रार्थना

कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे.

आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे.

दीपिका आणि रणवीर"

'दीपवीर' या पोस्टवर चाहत्यांच्या आणि कलाकारांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सर्वजण त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता चाहत्यांना "दुआ"ला पाहण्याची ओढ लागली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा 'सिंघम अगेन' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने अनेक हिट चित्रपट केले आहेत. रणवीरच्या एनर्जीचे तर चाहते दिवाने आहेत. मुलीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर खूप खुश पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT