Raashii Khanna Buy New House Saam Tv
मनोरंजन बातम्या

'योद्धा' फेम Raashii Khanna ने हैदराबादमध्ये खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

Raashii Khanna Buy New House: राशि खन्नाकडे आधीच दोन घरं आहेत. आता तिने हैदराबादमध्येच तिसरे घर खरेदी केले आहे. राशिने पहिले घर २०१५ मध्ये आणि दुसरे घर २०१७ मध्ये खरेदी केले होते.

Priya More

Raashii Khanna Movie:

बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री राशि खन्ना (Raashii Khanna) सध्या चर्चेत आली आहे. 'योद्धा' फेम राशि खन्नाने हैदराबादमध्ये नवीन घर खरेदी केले. राशि खन्नाने नवीन घरामध्ये गृहप्रवेश केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राशिने कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत नव्या घराची पूजा केली. राशि खन्नावर सध्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

राशि खन्नाकडे आधीच दोन घरं आहेत. आता तिने हैदराबादमध्येच तिसरे घर खरेदी केले आहे. राशिने पहिले घर २०१५ मध्ये आणि दुसरे घर २०१७ मध्ये खरेदी केले होते. राशि खन्नाने नव्या घराच्या पूजेसाठी पारंपारिक लूक केला होता. तिने लाल रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. समोर आलेल्या फोटोंमध्ये राशि खन्नाचे आई-वडील आणि इतर नातेवाईक दिसत आहेत. राशि खन्नाला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचसोबत तिचे कौतुक केले जात आहे.

राशि खन्ना नुकताच 'योद्धा' चित्रपटामध्ये दिसली. या चित्रपटामध्ये राशि खन्नासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. राशि खन्ना लवकरच 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये राशि खन्ना ही विक्रांत मेस्सीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त राशि खन्नाच्या हातामध्ये तमिळ चित्रपट 'अरनमानई 4' आणि तेलुगू चित्रपट 'तेलुसू काडा' हे आहेत.

राशि खन्ना फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम करते. राशी खन्ना साऊथ इडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. राशी खन्नाचा जन्म ३० नोव्हेंबर १९३० रोजी दिल्लीत झाला. तिने आपल्या करिअरची सुरूवात जॉन अब्राहमच्या 'मद्रासक कॅफे' या चित्रपटातून केली होती. राशि खन्ना अभ्यासात खूप हुशार होती. तिला आयएए ऑफिसर बनाचते होते. पण लहानपणापासूनच तिला अभिनेत्री होण्याची इच्छा होती. बरीच मेहनत करून ती अभिनेत्री झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

SCROLL FOR NEXT