Do Aur Do Pyaar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Do Aur Do Pyaar: विद्या बालनच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 'दो और दो प्यार'चा फर्स्ट लूकसोबत रिलीज डेट आऊट

Do Aur Do Pyaar Movie First Look: 'दो और दो प्यार' या चित्रपटामध्ये विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अपलोज एंटरटेन्मेंट आणि एलिप्सि एंटरटन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Priya More

Do Aur Do Pyaar Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्या बालन एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच विद्या बालनच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. विद्या बालनच्या या चित्रपटाचे नाव 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar Movie) असं असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. त्याचसोबत या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.

'दो और दो प्यार' या चित्रपटामध्ये विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अपलोज एंटरटेन्मेंट आणि एलिप्सि एंटरटन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्यांनी असे लिहिले की, ' या हंगामाध्ये प्रेम तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुम्हाला गोंधळात टाकेल.' हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही निर्मात्यांनी सांगितले आहे.

अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत 'दो और दो प्यार', एक एलिपसिस एंटरटेनमेंट प्रोडक्शन, प्रेम, हशा आणि आधुनिक नातेसंबंधांची चमकदार कथा असणार आहे. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी प्रोडेक्टबद्दल चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. यावरून आज पडदा हटवण्यात आला आहे. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ हे दोघेही एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघींचेही चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

पोस्टरमध्ये विद्या बालन सेंधिलच्या प्रेमात पडताना दिसणार आहे. तर इलियाना अभिनेता प्रतीक गांधीच्या प्रेमात पडताना दिसणार आहे. 'दो और दो प्यार' हा चित्रपट निर्माता श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा त्याचा डेब्यू चित्रपट आहे. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'द लव्हर्स' या परदेशी चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर भाष्य करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT