Tiger 3 New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 New Poster: 'तयार राहा...टायगर येतोय', 'टायगर ३'च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खानचा खतरनाक लूक

Salman Khan New Look From Tiger 3: कतरिना कैफनंतर आता 'टायगर 3' मधील सलमान खानचा नवा लूक समोर आला आहे.

Priya More

Tiger 3 Movie Trailer Release Date:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून हे सुपर-स्पाय कपल टायगर आणि झोयाच्या भूमिकेत लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी कतरिना कैफचा फर्स्ट लूक समोर आला होता. कतरिना कैफनंतर आता 'टायगर 3' मधील सलमान खानचा नवा लूक समोर आला आहे.

टायगर ३ चे आज नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. यामध्ये सलमान खानचा खतरनाक लूक सर्वांना पाहायला मिळाला. या लूकमध्ये 'दबंग खान' गळ्यात स्कार्प गुंडाळलेला दिसत आहे. हा लूक पाहून यावेळी या चित्रपटातील सलमानचा अॅटिट्यूड आणखी धोकादायक असणार हे दिसून येत आहे. सलमानने हे नवीन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर 'दबंग खान'चा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.

सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील नव्या लूकचे पोस्टर शेअर केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'टायगर येत आहे. १६ ऑक्टोबरला... तयारीला लागा.' सलमान खानच्या या लूकचे खूप कौतुक होत आहे. 'टायगर ३' चा ट्रेलर रिलीज व्हायला फक्त ५ दिवस उरले आहेत. 'टायगर ३' चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी, 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा लूक समोर आला होता. यामध्ये कतरिना दोरीला लटकून हातामध्ये बंदूक घेऊन गोळ्या झाडताना दिसली होती. झोयाचा हा लूक चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना खूप आवडला होता. दरम्यान, 'टायगर ३'चा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरबद्दल दोघांचेही चाहते खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफशिवाय या चित्रपटात इम्रान हश्मी मुख्य भूमिकेत आहे. सलमान खानच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर २०२३ रोजी म्हणजे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. हे दोन्ह भाग सुपरहिट ठरले होते. आता तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ रिलीज होणार असून हा भाग देखील सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT