Nana Patekar Slaped a guy | Bollywood News Director open up on Nana Patekar Slaped a guy incident - Saam Digital
मनोरंजन बातम्या

Bollywood News: नाना पाटेकरांनी त्याला मारलं खरं पण... खुद्द चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितलं घटनेमागचं सत्य

Bollywood News: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर दमदार अभिनय आणि वेगळ्या शैलीमुळे कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी ते एका चाहत्याला थप्पड मारल्यामुळे चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood News

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर दमदार अभिनय आणि वेगळ्या शैलीमुळे कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी ते एका चाहत्याला थप्पड मारल्यामुळे चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मात्र हा चित्रपटामधील एक शॉट असल्याचा दावा केला आहे.

नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ वाराणसीतील दशाश्वमेध घाटावरील आहे. त्यांच्या अपकमिंग 'जर्नी' चित्रपटाचं शूटींग मागच्या काही दिवसांपासून या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान आज दशाश्वमेध घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चित्रपटाचं शूटींग सुरू होतं. नाना पाटेकर शूटींगसाठी तयार होते. त्याचं सर्व लक्ष शूटींग आणि डायलॉगवर असताना एक तरुण नाना पाटेकर यांच्या जवळ जातो आणि परवानगी शिवाय सेल्फी घेऊ लागतो. त्यामुळे संतापलेल्या नानांनी त्याला थप्पड लगावली. थप्पड मारल्यानंतर नाना त्याला काहीतरी बोलत असताना दिसतायेत. या दरम्यान चित्रपटाचा एक क्रू मेंबर त्याच्या मानेला पकडून त्याला ओढून घेऊन जोतो. दरम्यान नानांच्या या कृत्यामुळे चाहते त्यांच्यावर नाराज झाले असून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासंदर्भात चित्रपटाचे डायरेक्टर अनिल शर्मा यांनी मात्र असा कोणताच प्रकार झाला नसून तो चित्रपटामधील एक सीन असल्याचा दावा केला आहे. या बातमीबाबत आपल्याला माहिती मिळाली असून हाच व्हिडीओ पहात असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले नानांनी कोणाला मारलेलं नाही. नानांना ज्या तरुणाला मारण्याचा सीन आहे, त्याचं शूटींग आम्ही बनारसच्या रस्त्यांवर करत आहोत. शूटींग सुरू होती आणि नानांनी त्याला मारलं देखील आणि हा प्रसंग आजूबाजला जमलेल्या प्रेक्षकांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर लीक केला. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे, जे चूकीचं आहे. लोकांनी या व्हिडीओ मागची सत्यता जाणून घेतली पाहिजे, असं अनिल शर्मा म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT