Ajay Devgn Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singham 3 Movie: 'सिंघम ३' च्या सेटवर मोठी दुर्घटना; अजय देवगण जखमी, शूटिंग कॅन्सल

Priya More

Ajay Devgn Injured During Movie Shooting:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या सेटवरून अजय देवगणसोबत इतर कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे.

मुंबईमध्ये सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अशातच शूटिंगदरम्यान अजय देवगण पुन्हा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजय देवगण जखमी झाल्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगण 'सिंघम 3' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग सुरू असताना सेटवर अजय देवगणच्या डोळ्याला अचानक दुखापत झाली. त्यामुळे तो नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घेत आहे. एका सूत्राने झूम दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'अजय देवगण जखमी झाल्यामुळे 'सिंघम 3' ची शूटिंग सध्यातरी रद्द करण्यात आले आहे.'

'अजय देवगण जखमी झाल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. पण आता शक्यता आहे की लवकरच शूटिंग सुरू होईल. आता या चित्रपटाची टीम हैदराबादमध्ये पुढचे शूटिंग करेल. कारण चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा आधीच निश्चित केल्या गेल्या होत्या. मुंबईमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये रद्द करण्यात आलेले चित्रपटाचे शूटिंग आता हैदराबादमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पुन्हा केले जाईल. या चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्याची खूप आवश्यकता आहे. इतर सेलिब्रिटींनी त्यांचे बऱ्यापैकी शूटिंग पूर्ण केले आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. यावेळी या चित्रपटामध्ये करीना कपूर खानसोबत दीपिका पदुकोणनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सर्वच सेलिब्रिटींचे एक-एक करत फर्स्ट लूक समोर आले होते जे पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली होती. रोहित शेट्टीचा हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT