Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

TBMAUJ 2nd Day Collection: शाहिद- क्रितीच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ची बॉक्स ऑफिवसवर जादू, दुसऱ्या दिवशीही केली बक्कळ कमाई

TBMAUJ Box Office Collection Day 2nd: या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

Priya More

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Senon) यांचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie) हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाला समिक्षणामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या व्हॅलेंटाईन वीकचा चित्रपटाला प्रचंड फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या चित्रपटाने जवळपास 6.7 कोटींचा व्यवसाय केला होता. तर या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच शनिवारी 9.50 कोटींची कमाई केली आहे. अशारितीने या चित्रपटाची दोन दिवसांची कमाई एकत्र केली तर चित्रपटाने दोन दिवसांत 18.20 कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाने जगभरामध्ये पहिल्याच दिवशी 14 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये वाढ झाली असून दुसऱ्या दिवशीची कमाई 25 कोटींवर पोहचली. अशामध्ये शाहिद आणि क्रितीसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

क्रिती आणि शाहिद कपूरची केमिस्ट्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मॅडॉक फिल्मने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. या चित्रपटात शाहीद कपूर आणि क्रिती सेनॉनसोबत धर्मेंद्र आणि डिंपल कपाडियासारखे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर लव्हर बॉयच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेनॉन रोबोटच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये ईद मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

SCROLL FOR NEXT