Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya  Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाहिद- क्रितीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली, ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ ची 100 कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री

TBMAUJ Worldwide Collection: व्हॅलेंटाईन विकमध्ये दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट चालला आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.

Priya More

TBMAUJ Day 10 Box Office Collection:

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर आणि क्रितीच्या (Kriti Sanon And Shahid Kapoor) ‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये चांगली कमाई करताना दिसत आहे. व्हॅलेंटाईन विकमध्ये दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट चालला आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.

रोबोट आणि माणूस अशी हटके लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ९ फेब्रुवारीला रिलीज झाला. चित्रपटाला फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित चित्रपटाला दुसऱ्या विकेंडला देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाने शनिवारी बॉक्स ऑफिसवर 6 कोटी रुपयांचे कलेक्शन केले असून यासह देशभरातील चित्रपटाची एकूण कमाई 58.20 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. चित्रपट निर्मात्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हणजे ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, चित्रपटाने जगभरात 107.86 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतात 62.05 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. यावेळी निर्मात्यांनी प्रेक्षकांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे.

दरम्यान, मॅडॉक फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्यांच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT