Salman Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: टायगरचा जलवा! सलमान खानचा स्वॅग पाहून चाहते क्लीन बोल्ड; VIDEO व्हायरल

Priya More

Salman Khan Video:

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding) नुकतेच जामनगरमध्ये पार पडले. या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडपासून (Bollywood) ते हॉलिवूडपर्यंत (Hollywood) अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

या फंक्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी चार चाँद लावले. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खानने (Salman Khan) या फंक्शनमध्ये जबरदस्त डान्स करत जलवा दाखवला. त्याचे डान्सचे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले. या सगळ्यानंतर सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग फंक्शन संपल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सलमान खान पोहोचला होता. सलमान खानचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान जामनगर एअरपोर्टवर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान डॅशिंग लूकमध्ये दिसत होता. सलमान खानची धांसू एन्ट्री पाहून त्याचे चाहते चकीत झाले.

पापाराझींनी नुकताच सलमान खानला जामनगर एअरपोर्टवर स्पॉट केले. यावेळी सलमान खानची स्टाइल सर्वांना प्रचंड आवडली. सलमान खानने काळ्या टी-शर्टसोबत जीन्स परिधान केली होती. सलमान खानच्या जीन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमान खानच्या जीन्सवर कार्टून कॅरेक्टर रेखाटण्यात आले होते. सलमान खानचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांनी खूप शेअर केला आहे.

'टायगर 3' स्टार सलमान खानचा हा व्हिडिओ समोर येताच होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सलमान खानच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करताना दिसले. सलमान खानच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, 'जलवा है भाईजान का'. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'यार, सलमान खान दिवसेंदिवस देखणा दिसत आहे'. सलमान खानच्या या व्हिडीओला खूप चांगली पसंती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसे नेते प्रकाश महाजन यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT