Ayushmann Khurrana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sakal Sanman Award 2024: मी आभारी आहे!, आयुष्मान खुरानाला मिळाला 'स्टार ऑफ द डेकेड' अवॉर्ड; पोस्ट शेअर करत म्हणाला...

Ayushmann Khurrana: चित्रपटामधील दमदार अभिनयासाठी आयुष्मान खुरानाला अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. अशामध्ये आता आयुष्मान खुरानाला आणखी एक पुरस्कार मिळाला आहे.

Priya More

Ayushmann Khurrana Got One More Award:

बॉलिवूडच्या (Bollywood) टॉप अभिनेत्यांमध्ये आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) नाव घेतले जाते. आयुष्मान खुराने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून देखील चांगली पसंती मिळत असते. आयुष्मानच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. चित्रपटामधील दमदार अभिनयासाठी आयुष्मान खुरानाला अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. अशामध्ये आता आयुष्मान खुरानाला आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये आयुष्यमान खुरानाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याबाबत आयुष्मानने सोशल मीडियावर पोस्ट करत आभार मानले आहेत.

नुकताच पार पडलेल्या सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये आयुष्मान खुरानाला 'स्टार ऑफ द डेकेड' (Star of the Decade Award) हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आयुष्मान खुराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पुरस्कार सोहळ्यातील त्याने दोन व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. ही पोस्ट करत त्याने सर्वांचे आभार मानले आहे. त्याने या पोस्टला कॅप्शन दिले की, 'सकाळ मीडिया मी आभारी आहे!'स्टार ऑफ द डेकेड' पुरस्कार मिळाला.'

आयुष्मान खुरानाच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत आयुष्मान खुरानाचे खूप कौतुक केले आहे. सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्याला आयुष्मान खुरानासोबत जॅकी श्रॉफ, श्रद्धा कपूर, तानाजी शिंदे, अमेय वाघ, वैदही परशुरामी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, अभिनेता आयुष्मान खुरानाने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विकी डोनर' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, आयुष्माननं 'बरेली की बर्फी', 'शुभ मंगल सावधान', 'बधाई हो', 'अंधाधुन', 'ड्रीम गर्ल-2' या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. महत्वाचे म्हणजे, यामधील अनेक चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला पुरस्कार देखील देण्यात आला आहे. आयुष्मान खुराना उत्कृष्ट अभिनेत्यासोबत गायक देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT