Saif Ali Khan Health Update: Saif Ali Khan Discharged Form Hospital Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Health: सैफ अली खानला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, अभिनेत्याचा सर्जरीनंतरचा फोटो व्हायरल

Saif Ali Khan Health Update: Saif Ali Khan Discharged Form Hospital |खांद्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतरचे सैफ अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Saif Ali Khan Triceps Factures:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफ अली खानच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला सोमवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खांद्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतरचे सैफ अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खानला ट्रायसेप्समध्ये समस्या येत होती. परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी ट्रायसेप्सची शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. सैफ रुग्णालयामध्ये असल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले होते. तो लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करत होते. आता सैफला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

सैफ अली खानने झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'मला ट्रायसेपची दुखापत झाली होती. मला बराच वेळ वेदना होत होत्या. कधी कमी तर कधी जास्त वेदना होत होत्या. पण कधी कधी वेदना असह्य होत होत्या. ही दुखापत गंभीर असेल हे मला खरेच माहीत नव्हते. देवरा या चित्रपटासाठी अॅक्शन सीन करत असताना मला खूप दुखापत झाली होती. तेव्हा माझ्या लक्षात आले नाही. मला वाटले सर्व काही ठीक आहे. कसेबसे मी काम पुढे ढकलले. एकदा मी व्यायाम करत असताना वेदना वाढल्या. पण नंतर बरं वाटलं. पण नंतर वेदना वेगाने सुरू झाल्या. जर मी जोर लावणारे काही काम केले तर जास्त दुखायचे. त्यामुळे मी एमआरआय करून घेण्याचा विचार केला.'

सैफने पुढे सांगितले की, 'जेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा असे कळाले की ट्रायसेप टेंडन फाटले आहे. शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू झाल्यावर असे लक्षात आले की ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे तो कट खूप मोठा असल्याने शस्त्रक्रिया आवश्यक आहे. ही शस्त्रक्रिया वेळेवर झाली नसती तर मला एक हात गमवावा लागला असता.' अभिनेत्याने सांगितले की, 'रुग्णालयात माझी चांगली काळजी घेण्यात आली.' तसंच, त्याने डॉक्टरांचे आभार देखील मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT