Nitu Kapoor Ignore Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nitu Kapoor Ignore Alia Bhatt : 'दोघींमध्ये काही तरी गडबड आहे', नीतू कपूरने सून आलिया भट्टला केलं इग्नोर, VIDEO व्हायरल होताच चर्चेत

Animal Movie: चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर नुकताच मुंबईत ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आली होती.

Priya More

Animal Film Success Party:

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपट (Animal Movie) सुपरहिट ठरला. या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. प्रेक्षकांना रणबीरचा अभिनयही खूप आवडला. या चित्रपटाने एका महिन्यातच बॉक्स ऑफिससह जगभरात 886 कोटींपेक्षा जास्त कमाई (Animal Box Office And Worldwide Collection) केली.

चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर नुकताच मुंबईत ‘ॲनिमल’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आली होती. रणबीर कपूर सोबत त्याची पत्नी आलिया भट्ट, आई नीतू कपूर आणि सासरे महेश भट देखील आले होते. रणबीरने यावेळी आपल्या कुटुंबासोबत पापाराझींसाठी जबरदस्त पोझ दिल्या. यावेळी नीतू कपूर पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर सून आलिया भट्टकडे दुर्लक्ष करताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

या कार्यक्रमादरम्यान रणबीर कपूरने सर्वप्रथम आई नीतूचा हात धरून एन्ट्री केली. यानंतर महेश भट्ट आणि आलिया भट्ट यांनीही पापाराझींसमोर फोटो क्लिक करायला सुरुवात केली. यावेळी रणबीरने लगेच आलियाला आपला हात धरण्यास सांगितले आणि अभिनेत्री त्याच्याकडे पाहतच राहिली. या फोटोसेशन दरम्यान आलियाने तिच्या सासूकडे एकदाही पाहिले. दोघींनी एकदाही एकत्र फोटो क्लिक केलेला नाही. पोज देताना दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले. नीतू कपूर देखील आलियाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.

विरल भयानीने आलिया आणि नीतू यांचा हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'दोघींमध्ये काहीतरी गडबड आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'वाटते की दोघी एकमेकांना पसंत करत नाहीत.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'नीतूने आता दोघांनाही त्यांची स्पेस द्यावी.' तर आणखी एकाने लिहिले की, 'ती तिच्या मुलावर खूप नियंत्रण ठेवते.' दरम्यान, नीतू कपूरने आलिया भट्टकडे सार्वजनिकपणे दुर्लक्ष करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. त्यामुळे आता व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा होऊ लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

SCROLL FOR NEXT