Bollywood Celebrity In Ayodhya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Mandir Inauguration: आलिया-रणबीरपासून ते रजनीकांतपर्यंत, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले बॉलिवूड सेलिब्रिटी

Bollywood Celebrity Reached In Ayodhya: या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी बॉलिवूडपासून (Bollywood) ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचे (South Film Industry) अनेक सेलिब्रिटी अयोध्येकडे रवाना झाले आहेत तर काही जण अयोध्येमध्ये पोहचले आहेत.

Priya More

Ram Mandir:

राम मंदिराचा (Ram Madir) प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले आहे. अयोध्या धाम रामलल्लाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण अवघ्या काही तासांनी राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Inauguration) होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी बॉलिवूडपासून (Bollywood) ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचे (South Film Industry) अनेक सेलिब्रिटी अयोध्येकडे रवाना झाले आहेत तर काही जण अयोध्येमध्ये पोहचले आहेत.

अयोध्येमध्ये आलेल्या बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींमध्ये कंगना रनौत, अमिताभ बच्चन, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, शंकर महादेवन, कतरीना कैफ, विकी कौशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. हे सर्व सेलिब्रिटी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत अयोध्येमध्ये रविवारीच दाखल झाली. तिने हनुमान गढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याचसोबत सध्या कंगना रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली आहे. अयोध्येमधील भक्तीमय वातावरणाचे कंगना रनौतने खूपच कौतुक केले आहे. कंगना रनौतसोबत रजनीकांत, अनुपम खेर, शंकर महादेवन, अनु मलिक, मधुर भांडारकर, सोनू निगम, विवेक ओबेरॉय, गजेंद्र चौहान, रणदीप हुड्डा हे सेलिब्रिटी अयोध्येमध्ये पोहचले आहेत.

सध्या बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने हे मुंबईवरून अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. हे कपल देखील या ऐतिहासिक कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडते महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रोहित शेट्टी, राम चरण, चीरंजीवी, कैलाश खेर हे सर्व सेलिब्रिटी देखील आयोध्येला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात हजेरी लावून हे सर्व सेलिब्रिटी कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT