Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul Preet Singh Wedding: रकुल प्रीत- जॅकीच्या घरी लगीनघाई, नवरदेवाचे घर लाइटिंगने सजलं; VIDEO व्हायरल

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू असली तरी देखील त्यांनी अधिकृतरित्या घोषणा केली नाही. अशातच सोशल मीडियावर जॅकी भगनानीच्या घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नानिमित्त त्याचे घर सजवण्यात आले आहे.

Priya More

Jackky Bhagnani House Decoration For Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लग्नामुळे चर्चेत आहे. रकुल प्रीत सिंग लवकरच तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (jackky bhagnani) विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. याच महिन्यामध्ये २१ तारखेला हे कपल गोव्यामध्ये इंटिमेट मॅरेज करणार आहे. या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू असली तरी देखील त्यांनी अधिकृतरित्या घोषणा केली नाही. अशातच सोशल मीडियावर जॅकी भगनानीच्या घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नानिमित्त त्याचे घर सजवण्यात आले आहे.

पिंकव्हिलाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जॅकी भगनानीच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. जॅकीच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॅकीच्या मुंबईतील घराचे दोन-तीन मजल्यांना सुंदर लाइटिंग करण्यात आली आहे. रकुल आणि जॅकी हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. या कपलच्या लग्नासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

नुकताच रकुल प्रीत सिंगचा देखील तिच्या कुटुंबियांसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रकुल मिठाईचा बॉक्स आणि काही गिफ्ट्स घेऊन कारमधून उतरताना दिसली. रकुलसोबत तिचे आई-बाबा आणि मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी तिने पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ देखील दिल्या. यावेळी पापाराझींनी देखील रकुलला खूप शुभेच्छा दिल्या.

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, हे कपल 21 फेब्रुवारीला गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. जॅकी आणि रकुल यांच्या लग्नाचे कार्यक्रम 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. आधी हे कपल परदेशात लग्न करणार होते. पण नंतर 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनंतीनंतर त्यांनी लग्नाचे ठिकाण बदलले. रकुल आणि जॅकी लग्नानंतर 22 फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहेत. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील बडे स्टार्स हजेरी लावू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT