Rakul Preet- Jackky Bhagnani Wedding Cute Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

सप्तपदीपासून ते समुद्रामध्ये मस्तीपर्यंत, Rakul Preet- Jackky Bhagnani चं असं पार पडलं लग्न; एकाच VIDEO मध्ये पाहा झलक

Priya More

Rakul Preet- Jackky Bhagnani Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jacky Bhagnani) यांनी आपल्या प्रेमाला नवीन नाव दिले आहे. रकुल आणि जॅकीने २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न केले. जवळचे नातेवाईक आणि कुटुंबींयाच्या उपस्थितीमध्ये दोघांनी लग्न केले. रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या दोघांवर देखील चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशामध्ये रकुल प्रीतने नुकताच सोशल मीडियावर लग्नातील क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रकुल प्रीत आणि जॅकीने सप्तपदी घेतल्यापासून ते समुद्रामध्ये मस्ती करण्यापर्यंतची झलक पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओला खूप चांगली पसंती मिळत आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या क्युट फोटोंनंतर आता त्यांच्या ग्रँड वेडिंगचा सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला रकुल प्रीत आणि जॅकीच्या हळदी सिरेमनी, संगीत सिरेमनी, मेहंदी सिरेमनी, सप्तपदी घेताना, एकामेकांना वरमाला घालताना आणि समुद्रामध्ये मस्ती करतानाचे प्रत्येक क्षण पाहायला मिळत आहेत. लग्नामध्ये हे कपल खूपच क्यूट आणि आनंदी दिसत होते.

लग्नाचे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी त्यांच्या लग्नाचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला रकुल प्रीत जबरदस्त एन्ट्री करते. त्यानंतर ती नाचत नाचत स्टेजवर उभ्या असलेल्या जॅकीकडे जाते. त्यानंतर दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. एकमेकांना वरमाला घातल्यानंतर लग्नाला उपस्थित असलेले सर्वजण एकच जल्लोष करतात. त्यानंतर या व्हिडीओमध्ये रकुल प्रीत आणि जॅकी मेहंदी, हळदी आणि संगीत सिरेमनीमध्ये धमाल करताना दिसत आहेत. त्यानंतर ते समुद्रामध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत मजा-मस्ती करताना दिसत आहेत.

लग्नाचा क्युट व्हिडीओ शेअर करत रकुल प्रीतने सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, 'हे तुझं आणि माझं नाही तर आपलं आहे.' दरम्यान, रकुल आणि जॅकीचा हा शाही विवाह सोहळा गोव्याच्या ITC ग्रॅन्ड साऊथमध्ये पार पडला. गोव्यामध्ये लग्न केल्यानंतर आता हे कपल मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. त्यांच्या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. लग्नानंतर हे कपल आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या लग्नसोहळ्यामध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, अर्जून कपूर, वरुण धवन-नताशा दलाल, शाहिद कपूर- मीरा राजपूत, आयुष्मान खुराना- ताहिरा कश्यप, अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर, भूमी पेडणेकर, रितेश देशमुख, यांनी हजेरी लावली.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकीची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दोघेही शेजारी होते. पण त्यांना कधीच कळले नाही. मैत्री नव्हती, पण लॉकडाऊन दरम्यान त्यांच्यात एक बॉन्ड तयार झाला आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. रकुल आणि जॅकीने २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आता या कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. येत्या २१ फेब्रुवारीला रकुल प्रीत कायमची जॅकी भगनानीची होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

SCROLL FOR NEXT