Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul-Jackky Wedding: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नानंतर हनीमूनला नाही जाणार, प्लॅन कॅन्सल का केला ?

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Honeymoon: गोव्यामध्ये या कपलचा शाही विवाहसोहळा (Rajul-Jackky Wedding) पार पडला आहे. त्यांच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यांचे चाहते देखील त्यांच्या लग्नाबाबतचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Priya More

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. रकुल प्रीत सिंग येत्या २१ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (jackky bhagnani) विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गोव्यामध्ये या कपलचा शाही विवाहसोहळा (Rajul-Jackky Wedding) पार पडला आहे. त्यांच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यांचे चाहते देखील त्यांच्या लग्नाबाबतचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

२१ तारखेला रकुल आणि जॅकी गोव्यामध्ये इंटिमेट मॅरेज करणार आहे. दोघांचेही मुंबईतील घरी सुंदर सजावट करण्यात आली आहे. त्यांच्य लग्नाची थीम काय असणार आहे याबाबत देखील चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील व्हायरल झाली होती. आता या कपलच्या लग्नाबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आले आहे. हे कपल लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीये. त्यांनी आपला हनीमूनला जाण्याचा प्लॅन का कॅन्सल केला यामागचे कारण देखील समोर आले आहे.

ई टाइम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्री तिच्या लग्नाच्या ३ दिवस आधीपर्यंत काम करणार आहे आणि लग्नाच्या सुमारे एक आठवड्यानंतर ती एका नवीन बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र, त्या चित्रपटात तिचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण ती या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. तर जॅकी भगनानी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटात व्यस्त असेल. कारण निर्माता म्हणून हा त्याचा मोठा चित्रपट असणार आहे. अशा परिस्थितीत दोघेही त्यांचे हनिमून प्लॅन रद्द करू शकतात आणि कामातून ब्रेक घेऊन नंतर हनिमूनचे प्लॅन करू शकतात असे सांगितले जात आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, रकुल आणि जॅकी 21 फेब्रुवारीला गोव्यातील आलिशान हॉटेल ITC ग्रँडमध्ये लग्न करणार आहेत. दोघांचे लग्न अतिशय शाही पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये फक्त मित्र आणि कुटुंबातील सदस्यच उपस्थित राहू शकतात. या शाही लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये वेगवेगळ्या थीम पाहायला मिळतात. तसेच रकुल आणि जॅकीचे शाही लग्न देखील इको फ्रेंडली असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

SCROLL FOR NEXT