Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Last Video: पूनम पांडेची शेवटची इन्टा पोस्ट, ३ दिवसांपूर्वी क्रुझ पार्टीत केली होती धम्माल

Poonam Pandey: ३२ व्या वर्षी पूनम पांडेने या जगाचा निरोप घेतला. पूनम पांडेच्या निधनाची माहिती कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पूनम पांडेच्या निधनाबाबत (Poonam Pandey Death) तिच्या टीमने माध्यमांना याबाबत माहिती दिली.

Priya More

Poonam Pandey Last Insta Post:

बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये नेहमी वादामुळे चर्चेत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे (Poonam Pandey) नाव नेहमी असायचे. याच पूनम पांडेबाबत एक धक्कादायक बातमी आज समोर आली. पूनम पांडेचे निधन झाले असून याबाबत सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

३२ व्या वर्षी पूनम पांडेने या जगाचा निरोप घेतला. पूनम पांडेच्या निधनाची माहिती कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पूनम पांडेच्या निधनाबाबत (Poonam Pandey Death) तिच्या टीमने माध्यमांना याबाबत माहिती दिली. पूनम पांडेचे निधन गर्भाशयाच्या कॅन्सरने झाले आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या पूनम पांडेने ३ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

पूनम पांडेच्या मॅनेजमेंट टीमने आजतकला तिच्या निधनाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'काही दिवसांपूर्वी पूनम पांडेला कॅन्सरची लागण झाली. पूनमला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर होता. ती उत्तर प्रदेशमध्ये आपल्या गावी होती आणि तिथूनच तिच्यावर उपचार सुरू होते.' याच दरम्यान पूनम पांडेची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. तिने २९ जानेवारीला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये पूनम पांडे क्रुझवर पार्टीला जाताना दिसत आहे.

ब्लॅक कलरची लेदर पँट आणि व्हाइट कलरचा कॉर्सेट टॉप पूनम पांडेने परिधान केला होता. ती या व्हिडीओमध्ये आपल्या सिक्युरिटी टीमसोबत दिसत आहे. क्रुझवर जाताना ती मजा- मस्ती करताना दिसत आहे. ऐवढंच नाही तर, १५ दिवसांपूर्वी पूनम पांडेने एका इव्हेंटला हजेरी लावली होती. तिने कलरफूल डीपनेक ड्रेस परिधान केला होता. तिच्यासोबत अभिनेत्री दिव्या अग्रवाल देखील दिसत आहे. दोघीही खूपच आनंदी दिसत होत्या. पूनम आणि दिव्या पापाराझींच्या समोर खूपच मस्ती करताना दिसत आहेत. दोघींनी पापाराझींना खूप पोझ दिल्या.

पूनम पांडेच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. तर सोशल मीडियावर पूनमचे चाहते कमेंट्स करत तिच्या निधनावर विश्वास बसत नसल्याचे सांगत आहेत. 'नशा' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यात यश मिळाले नाही. पूनम पांडे ही सर्वात जास्त चर्चेत सोशल मीडियामुळे राहायची. आपले हॉट आणि बोल्ड व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करायची. या फोटो आणि व्हिडीओद्वारे ती सोशल मीडियावर खळबळ उडवून द्यायची. पूनम पांडे सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर सक्रिय असायची. इन्स्टाग्रामवर तिचे १.२ मिलियन फॉलोअर्स होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: साखरपुड्यात रक्तरंजित थरार! फोटो काढायला नकार दिल्याने तरुणाची सटकली, वेटरवर धाडधाड गोळ्या झाडल्या

Healthy Breakfast Without Eggs: हेल्दी नाश्त्यात फक्त अंडीच कशाला? या ४ घरगुती पदार्थातून मिळेल भरपूर प्रोटीन, एकदा ट्राय कराच!

Maharashtra Live News Update: चिखला गावात परिस्थिती शांत; नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य, शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तब्बल 46 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

अजब गजब! विहिर चोरीला गेली, शेतकरी आला रडकुंडीला; महाराष्ट्रात कुठे घडला धक्कादायक प्रकार?

SCROLL FOR NEXT