Bollywood Celebrities  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev Betting Case: 'महादेव बुक' अ‍ॅप प्रकरण, रणबीर कपूरनंतर बॉलिवूडचे आणखी सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर, कोण आहेत?

Online Gaming Case: या प्रकरणात ईडीच्या (ED) रडारवर आणखी बॉलिवूड कलाकार आणि गायक असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Mahadev Book:

ऑनलाइन बेटिंगसाठी प्रसिद्ध असलेले 'महादेव बुक' (Mahadev Book) अ‍ॅप सध्या चर्चेत आहे. या अ‍ॅपद्वारे होणाऱ्या मनी लाँड्रिंग याप्रकरणी (Money Laundering Case) ईडीकडून कारवाई सुरू आहे. याप्रकरणी ईडीने बुधवारी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणात ईडीच्या (ED) रडारवर आणखी बॉलिवूड कलाकार आणि गायक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी महादेव बेटिंग प्रकरणात अडकले आहेत. या प्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरु आहे. नुकताच ईडीने रणबीर कपूरला नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईडीच्या रडावर सध्या बॉलिवूडचे अनेक कलाकार आणि गायक आहेत. या सर्वांनी 'महादेव बुक' या ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपसाठी जाहिरात केल्याचे उघड झाले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि इतर गायकांनी महादेव बुक बेटिंग अॅपची जाहिरात केली होती. या सर्वांचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. ऐवढंच नाही तर महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे सर्व सेलिब्रिटी अडचणीत आले आहेत. या सर्वांना ईडी चौकशीसाठी बोलवण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, 'महादेव बुक'चे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी दुबईमध्ये स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. दोघेही दुबईमधून बेटिंग अ‍ॅप चालवतात. यामधील सौरभ चंद्राकर याने यावर्षीच फेब्रुवारीमध्ये दुबईत शाही विवाह केला होता. या लग्नासाठी त्याने तब्बल २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केली होती. या शाही लग्नसोहळ्याचा व्हिडीओ समोर आला होता. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेलिब्रिटींना सौरभने मोठी रक्कम दिल्याचे देखील सांगितले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT