Deepika Padukone Dress Price Saam tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: 'कॉफी विथ करण'मध्ये दीपिकाचा नखरा, गळ्यात घातला ९० लाखांचा नेकलेस; ड्रेसची किंमत ऐकूनही बसेल धक्का

Deepika Padukone Dress Price: दीपिका आणि रणवीरच्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दोघेही ब्लॅक कलरच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसले.

Priya More

Deepika Padukone Dress and Necklace Price:

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 8' (kofee with karan 8) नुकताच प्रेक्षकांच्या भेटाला आला आहे. या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शो सुरू होताच सोशल मीडियावर सध्या तो ट्रेंड करत आहे.

या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिचा पती अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) सहभागी झाली. शोमध्ये दीपिका आणि रणवीरने त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या शोमध्ये हे कपल रॉयल लूकमध्ये दिसले होते. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दीपिका आणि रणवीरच्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दोघेही ब्लॅक कलरच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसले. दीपिकाने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. तर रणवीर सिंगने ब्लॅक कलरचा ब्लेझर सूट परिधान केला होता. दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेस आणि तिच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण तुम्हाला माहीत आहे का दीपिका पदुकोणने शोमध्ये घातलेल्या ड्रेस आणि नेकलेसची किंमत किती होती. त्यांची किंमत जाणून तुम्हाला देखील धक्का बसेल.

दीपिका पदुकोणने व्हिक्टोरिया बेकहॅमचा ब्रँडचा ड्रेस परिधान केला होता. दीपिकाने या ब्लॅक कलरच्या कटआउट ड्रेसमध्ये तिचा किलर लूक दाखवला. दीपिका डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट आणि सुंदर दिसत होती. ती या ड्रेसिंगमध्ये खूपच परफेक्ट दिसत होती. दीपिकाचा हा ड्रेस व्हिक्टोरिया बेकहॅमच्या ब्रँडचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ड्रेसची किंमत जवळपास 999 डॉलर्स म्हणजेच 83 हजार रुपये आहे. दीपिकाच्या ड्रेसच्या किंमतीत तुम्ही आयफोन खरेदी करू शकता.

दीपिकाने परिधान केलेल्या व्हिक्टोरिया बेकहॅमचा हा ड्रेस स्लीव्हलेस होता. ज्यामध्ये दीपिका पदुकोण तिची स्लिम फिगर फ्लॉन्ट करत होती. या ड्रेसवर दीपिकाने कार्टियर नेकलेस गळ्यामध्ये घातला होता. 18 के रोझ गोल्ड मधला कार्टियर जस्ट अन क्लू नेकलेस 65 ब्रिलियंट-कट हिऱ्यांनी तयार करण्यात आला आहे. या नेकलेसची किंमत 30 ते 35 लाख रुपये आहे. पण जर दीपिकाने या नेकलेसचा 'बिग मॉडेल' घातला असेल तर त्याची किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे. दीपिकाचे या ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील तिच्या या लूकला पसंती देत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT