Raashii Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raashii Khanna: 'मला इंडस्ट्रीत न्यू कमर असल्यासारखं वाटतं', 'योद्धा' फेम राशी खन्ना असं का म्हणाली?

Priya More

Sidharth Malhotra And Raashii Khanna:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशि खन्ना (Rashi Khann) सध्या त्यांच्या आगामी 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. तिघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टीझर, गाण्यानंतर गुरूवारी जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धार्थ मल्होत्राची अ‍ॅक्शन आणि डायलॉग चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी राशी खन्नाने 'मला इंडस्ट्रीत न्यू कमर असल्यासारखे वाटतंय', असं म्हणाली. राशी खन्ना असं का म्हणाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

योद्धा चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पॅन इंडिया स्टार राशी खन्नाने सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिला नवीन कलाकारासारखे का वाटले? याबद्दल खुलासा केला आहे. हिंदी चित्रपटासाठी तिला इतका वेळ का लागला? याबद्दल बोलताना तिने सांगितले की, 'तिला अर्थपूर्ण स्क्रिप्ट हवी होती.' अष्टपैलू पॉवरहाऊस असलेली राशी म्हणते की, 'जर स्क्रिप्ट अर्थपूर्ण असेल तरच मला काम करावं असे वाटत. मला व्यक्तिरेखा आवडतात. त्यात येण्यासाठी माझ्यासाठी हे एक चांगलं पॅकेज असायला हवं आणि हा चित्रपट तसाच होता. मला तो चित्रपट पैसा वसुल करणार आहे असं वाटतं.', असा विश्वास तिने व्यक्त केला.

राशी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून या चित्रपटात थ्रिलिंग एलिमेंट्स आणि रोमान्स आहे. तसंच, सीट थ्रिलरची एक मज्जासुद्धा या चित्रपटामध्ये आहे असं तिला वाटतं. करण जोहरच्या 'योद्धा' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, योधा फिल्म धर्मा प्रोडक्शनची पहिली एरियल ॲक्शन फ्रँचायझी आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, 'योधा' 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

दरम्यान, योद्धा चित्रपट सुरूवातीला 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार होता आणि निर्मात्यांनी रिलीजची तारीख जुलै 2023, 15 सप्टेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आणि नंतर 8 डिसेंबर 2023 केली होती. आता हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टीसोबत 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. रोहित शेट्टी दिग्दर्शित ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT