Isha Koppikar And Timmy Narang:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Isha Koppikar: 14 वर्षांचं नातं तुटलं! बॉलिवूडच्या आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, समोर आलं धक्कादायक कारण

Isha Koppikar And Timmy Narang: ईशाने तिचा पती टिमी नारंगसोबत घटस्फोट घेतला आहे. ईशा आणि टिमीला ९ वर्षांची मुलगी आहे. आई-बाबा वेगळे झाल्यामुळे ईशा कोपीकरची मुलगी रियाना खूपच दुखावली आहे.

Priya More

Isha Koppikar Divorce:

बॉलिवूडची (Bollywood) 'खल्लास गर्ल' अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर सध्या चर्चेत आली आहे. ईशा कोपीकरच्या (Isha Koppikar) चाहत्यांसाठी ही खूपच धक्कादायक बातमी आहे. ईशाचे १४ वर्षांचं नातं तुटलं आहे. ईशाने तिचा पती टिमी नारंगसोबत घटस्फोट घेतला आहे. ईशा आणि टिमीला ९ वर्षांची मुलगी आहे. आई-बाबा वेगळे झाल्यामुळे ईशा कोपीकरची मुलगी रियाना खूपच दुखावली आहे. ईशाच्या घटस्फोटाच्या (Isha Koppikar Divorce) बातम्या जरी समोर येत असल्या तरी देखील याबाबत अभिनेत्रीने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

लग्नाच्या १४ वर्षानंतर ईशा आणि टिमी वेगळे झाले आहेत. या कपलला ८ वर्षांची मुलगी रियाना आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, लग्नाच्या 14 वर्षानंतर ईशा आणि टिमी यांनी वेगळं होतं घटस्फोट घेतला आहे. ईशा आणि टिमीचा नोव्हेंबर २०२३ मध्येच घटस्फोट झाला होता. यानंतर अभिनेत्रीने तिच्या 9 वर्षांच्या मुलीसोबत टिमीचे घर सोडले. घटस्फोटानंतर ईशाने तिची मुलगी रियानाची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, ईशा आणि टिमीने सुसंगततेच्या मुद्द्यावरून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ईशाने घर सोडले असून ती आपल्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. ईशा आणि टिमी या कपलकडे आदर्श आणि पॉवर कपल म्हणून पाहिले जात होते. घटस्फोटाच्या निर्णयामुळे ईशाच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. या दोघांनी आपलं लग्न टिकावं यासाठी खूप प्रयत्न केला. पण ते होऊ शकले नाही. शेवटी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

ईशा आणि टिम्मी यांची लव्हस्टोरी खूपच चर्चेत होती. त्यांच्या या लव्हस्टोरीची सुरुवात जिममधून झाली. सुरुवातीला मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांनी ३ वर्षे एकमेकांना डेट केले. 2009 मध्ये दोघांनीही लग्न केले. त्यानंतर अभिनेत्रीने करिअर सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ईशाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ईशा शेवटची तमिळ चित्रपट 'आयलान' मध्ये दिसली होती. याआधी ती 'लव्ह यू डेमोक्रेसी', 'अस्सी नब्बे पूर सौ' आणि 'कवचा' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ईशा कोप्पीकरने 'कृष्णा कॉटेज', 'डॉन', 'क्या कूल है हम', 'फिजा', 'एलओसी कारगिल' आणि '३६ चायना टाऊन' यासारख्या सुपरहिट बाॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT