Ira Khan Mehndi Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan Mehndi Ceremony: आयराच्या हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी, व्हायरल झाला मेहंदी सिरेमनीचा पहिला फोटो

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलीवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikare) यांचा लग्न सोहळा सध्या उदयपूरमध्ये सुरू आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाबाबत त्यांच्या फॅमिलीसोबत चाहते देखील खूपच उत्सुक आहेत. या कपलच्या वेडिंग फंक्शनला कालपासून सुरूवात झाली. आज आयरा आणि नुपूरचे मेहंदी सिरेमनी झाली. आयराच्या हातावर नुपूरच्या नावाची मेहंदी रंगली. या मेहंदी फंक्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आयरा आणि नुपूर खूपच सुंदर दिसत आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे ग्रँड वेडिंग उदयपूरमध्ये होणार आहे. दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार सध्या उदयपूरमध्ये असून लग्नाच्या सर्व विधींमध्ये खूपच एन्जॉय करताना दिसत आहेत. या कपलच्या लग्नाच्या कार्यक्रमाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता आयरा खानच्या मेहेंदी सिरेमनीचे फोटो समोर आले आहेत. व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये आयरा खानने व्हाइट कलरचा ड्रेस परिधान केलेला आहे आणि गॉगल लावला आहे. तर नुपूर शिखरे तिच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये आयरा खान आणि नुपूर शिखरे या दोघांच्या हातावर I लव्ह N असे लिहिलेले दिसत आहे.

3 जानेवारीला मुंबईत लग्नाची नोंदणी केल्यानंतर आता नुपूर आणि आयरा महाराष्ट्रीय पद्धतीने राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न (Ira Khan- Nupur Shikhare Wedding) करणार आहेत. आयराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तिने तिच्या लग्न पत्रिकेची झलक दाखवली होती. या लग्नपत्रिकेनुसार, 7 जानेवारीपासूनच लग्नाचे सर्व फंक्शन्स सुरू झाले आहेत. तर 10 जानेवारीला हे जोडपे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत.

आयरा आणि नुपूरच्या कुटुंबीयांसाठी आणि पाहुण्यांसाठी 176 हॉटेल रूम बुक करण्यात आल्या आहेत. या शाही विवाह सोहळ्याला सुमारे 250 जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नात सहभागी होण्यासाठी कुटुंबीय आणि इतर पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व पाहुणे 10 जानेवारीपर्यंत उदयपूरमध्येच राहणार आहेत. त्यांच्या राहण्या आणि खाण्याची उत्तम सोयी करण्यात आली आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या मेनूमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असेल. दरम्यान, इरा आणि नुपूर यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईतील वांद्र्यातील ताज लँड्स एंड येथे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

SCROLL FOR NEXT