Reena Dutta And Kiran Rao  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan Haldi Ceremony: आयरा- नुपूरचा हळदी समारंभ, आमिर खानच्या एक्स वाइफ्सच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Reena Dutta And Kiran Rao Video: इरा खानच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ समोर आले आहेत. रीना दत्ता आणि किरण राव हे महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Ira Khan Wedding:

बॉलिवूडचा (Bollywood) अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा खान (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) 3 जानेवारीला म्हणजे बुधवारी लग्न करणार आहे. आयरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात झाली आहे. लग्नानिमित्त दोन्ही कुटुंबीय खूपच आनंदी आहेत. इरा खानच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ समोर आले आहेत. या कार्यक्रमात रीना दत्ता आणि किरण राव हे महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसले.

आयरा आणि नुपूर महाराष्ट्रीय पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. आयरा आणि नुपूरचा हळदी समारंभ नुकताच पार पडला. यावेळी आयराची आई अर्थात रीना दत्ता आणि आमिर खानची एक्स वाइफ किरण राव या दोघींच्या लूकने या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधू घेतले. दोघींनी देखील नववारी साडी नेसली होती. या लूकमध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत होत्या.

रीना दत्ताने हिरव्या आणि लाल रंगाची नववारी साडी नेसली होती. तर किरण रावने जांभळ्या आणि निळ्या रंगाची नववारी साडी नेसली होती. किरण रावने केसामध्ये गजरा, गळ्यात ठुशी आणि पायामध्ये कोल्हापूरी चप्पल घालून आपला लूक परिपूर्ण केला होता. तर रीना दत्ता यांनी देखील हातामध्ये हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या आणि गळ्यामध्ये गोल्डन ज्वेलरी घालून आपला लूक परिपूर्ण केला होता.

आमिर आणि रीना यांच्या मुंबईतील घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, दोघांचे देखील घर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले आहे. आमिर खानच्या घराचे दोन मजले लाइट्सने सुंदरपणे सजवण्यात आले आहेत. तर रीना दत्ता यांचे घर देखील फुलांनी सजवण्यात आले आहे आणि घराला सुंदर लाईटिंग करण्यात आली आहे. दरम्यान, 3 जानेवारीला लग्नानंतर हे कपल मुंबईत एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रिसेप्शन 10 जानेवारीनंतर केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT