Rakesh Bedi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakesh Bedi: 'गदर २' फेम अभिनेत्याची मोठी फसवणूक, आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून ७५ हजारांना लावला चुना

Rakesh Bedi Falls Prey To Phone Scam: फोन स्कॅमद्वारे राकेश बेदी यांची हजारो रुपयांची फसवणूक केली आहे. राकेश बेदी यांच्या आधी अभिनेत्री अंजली पाटीलची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

Priya More

Gadar 2 Fame Actor Rakesh Bedi:

आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटी देखील याचे शिकार होताना दिसत आहेत. अशामध्येच आता 'गदर २' (Gadar 2 Movie) फेम अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) यांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फोन स्कॅमद्वारे राकेश बेदी यांची हजारो रुपयांची फसवणूक केली आहे. राकेश बेदी यांच्या आधी अभिनेत्री अंजली पाटीलची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

अनेक टीव्ही मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते राकेश बेदी यांची फसवूक झाली आहे. हजार- दोन हजार नाही तर तब्बल ७५ हजार रुपयांची त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अभिनेत्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

ईटाइम्सशी बोलताना राकेश बेदी यांनी सांगितले की, 'फसवणूक झाल्याप्रकरणी ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मी मोठ्या नुकसानीपासून वाचलो आहे. लष्कराच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. फसवणूक करणाऱ्या अशा टोळीपासून नागरिकांनी सावध राहावे.' राकेश बेदी यांनी सांगितले की, त्यांना एक फोन आला होता. त्या व्यक्तीने त्यांना आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले होते. त्या व्यक्तीने सांगितले होते की त्यांच्या पुण्यातील फ्लॅट मला आवडला आहे. मात्र आपली फसवणूक झाल्याचे अभिनेत्याच्या लक्षात येईपर्यंत त्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातून 75 हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले होते.'

राकेश बेदी यांनी पुढे सांगितले की, 'अशी कामं ही लोकं रात्रीच्या वेळी करतात. जर कोणी याचे शिकार झाले तर ते याप्रकरणाची तक्रार करू शकणार नाही. जोपर्यंत ती व्यक्ती याप्रकरणी तक्रार करायला पोलिस ठाण्यात जाईल तोपर्यंत दुसरा दिवस होईल. जेणे करून तक्रार करायला उशिर झालेला असतो. मी याप्रकरणी तक्रार केली असून पोलिसांनी बँकेशीसंबंधित सर्व डिटेल्स दिले आहेत. फसवणूक केलेल्या व्यक्तीच्या अकाऊंटचा देखील नंबर दिला आहे.' राकेश बेदी यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना सांगितले की, 'असे प्रकार अनेक दिवसांपासून होत आहेत. सुदैवाने मी जास्त पैसे गमावले नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT