Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Starcast Fees: 'अ‍ॅनिमल'साठी एकट्या रणबीर कपूरने घेतलं तगडं मानधन, इतर स्टार्सनी देखील केली जबरदस्त कमाई

Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Movie: चित्रपटाचा टीझर पाहून रणबीर आणि रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा (Animal Movie) रोमांचक टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा टीझर पाहून रणबीर आणि रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील रणबीर आणि रश्मीकाच्या लूकला चांगली पसंती मिळत आहे. अशामध्ये या चित्रपटाबाबतची माहिती जाणून घेण्याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.

या चित्रपटातील स्टारकास्टला निर्मात्यांकडून भली मोठी रक्कम (Animal starcast fees) देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. सुपरस्टार रणबीर कपूरला या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर इतर स्टार कास्टला देखील भरपूर पैसा मिळाला आहे. आज आपण 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या स्टार कास्टच्या फीबद्दल जाणून घेणार आहोत...

'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हा चित्रपट एकूण ३५ कोटी रुपयांना साइन केला होता. पण मधल्या काळात 'ब्रह्मास्त्र' आणि 'तू झुठी मैं मक्कार'च्या बंपर यशानंतर अभिनेत्याने आपली फी वाढवली. आता तो या चित्रपटासाठी ७० कोटी रुपये घेत आहे.

तर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून फकेत ४ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. रश्मिका मंदान्नाची फी रणबीर कपूरपेक्षा खूपच कमी आहे. फिल्मस्टार बॉबी देओल 'अ‍ॅनिमल' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याला ४ ते ५ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेता अनिल कपूरनेही त्याच्या व्यक्तिरेखेसाठी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी २ कोटी रुपये मानधन घेतले आहे. 'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी अभिनेता बिपिन कार्कीला त्याच्या भूमिकेसाठी ५० लाख रुपये दिले आहेत. टीव्ही स्टार राघव बिनानीही 'अ‍ॅनिमल'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याला पूर्ण ५० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT