बॉलिवूड (Bollywood) फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आनंद पंडित (Anand Pandit) यांनी गुरुवारी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. आनंद पंडित यांनी 'टोटल धमाल', 'ग्रेट गँड मस्ती' यासह अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. आनंद पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या बर्थडे पार्टीला (Anand Pandit Birthday Party) बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, उर्वशी रौतेलासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या पार्टीमध्ये चार चाँद लावले.
आनंद पंडित यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घरीच स्टार्स फेअरचं आयोजन केलं होतं. शाहरुख खानपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीला हजेरी लावलेल्या उर्वशी रौतेला आणि काजोलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघींही खूपच सुंदर दिसत होत्या.
'डिंकी' स्टार आणि बॉलीवूडचा 'किंग खान'ने हजेरी लावल्यामुळे ही बर्थडे पार्टी खूपच जबरदस्त झाली. शाहरुख खानने ब्लॅक कलरचा ब्लेझर परिधान केला होता. फॉर्मल्समध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. अभिनेत्री काजोल स्काय ब्लू कलरच्या चमकदार साडीमध्ये अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती. तिच्याकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पापाराझींना या दोघांनी जबरदस्त पोझ देखील दिल्या.
आनंद पंडित यांच्या पार्टीत बॉलिवूडची प्रसिद्ध पिता-पुत्राची जोडीही दिसली. या पार्टीत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन सहभागी झाले होते. बिग बींनी या पार्टीमध्ये हजेरी लावत पूर्ण लाइमलाइट स्वत: लूटले. लाल रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावत खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीचे या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या बर्थडे पार्टीसाठी वाणी कपूरने ऑल ब्लॅक लूक केला होता. ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये ती अप्रतिम दिसत होती. हृतिक रोशनही त्याचे वडील राकेश रोशनसोबत या पार्टीला हजेरी लावली. बॉलिवूडचा 'दबंग खान' म्हणजेच सलमान खानही या पार्टीत सहभागी झाला होता. अभिनेत्याने ब्लॅक कलरचा ब्लेझर परिधान केलेला दिसत होता.
नुकताच विवाहबंधनामध्ये अडकलेले नवविवाहित जोडपे रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिनने देखील या पार्टीमध्ये हजेरी लावली. याशिवाय अमिषा पटेलनेही आपल्या उपस्थितीने पार्टी अधिक सुंदर केली. अभिनेत्री तिच्या हॉट अवताराने पार्टीमध्ये आकर्षण वाढवताना दिसली. या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचसोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या आईसोबत या पार्टीमध्ये पोहचली. उर्वशीने सिल्वर कलरचा ट्रान्सपरेंट गाऊन परिधान केला होता. तिचा लूक सर्वांना प्रचंड आवडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.