Amitabh Bachchan Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Birthday: बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी 'जलसा'बाहेर चाहत्यांची गर्दी, अभिनेत्याने सरप्राईज देत वाढदिवस केला साजरा

Amitabh Bachchan Birthday Celebration Video: बिग बींनी आपल्या चाहत्यांना मध्यरात्री जबरदस्त सरप्राईज दिले. त्याचसोबत त्यांनी चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला.

Priya More

Happy Birthday Amitabh Bachchan:

बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी रात्रीपासूनच चाहत्यांनी 'जलसा' या त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

अशामध्ये बिग बींनी आपल्या चाहत्यांना मध्यरात्री जबरदस्त सरप्राईज दिले. त्याचसोबत त्यांनी चाहत्यांसोबत वाढदिवस (Amitabh Bachchan Birthday) साजरा केला. सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कधी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. तर कधी घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटायला देखील ते जातात. बिग बींना भेटण्यासाठी त्यांचे चाहते दर रविवारी त्यांच्या घराबाहेर येतात. अशामध्ये बिग बींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. बुधवारी रात्रीपासूनच चाहत्यांनी बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. चाहते निराश होऊ नये यासाठी बिग बी घराबाहेर आले आणि त्यांनी सरप्राईज देत चाहत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चाहत्यांचे हात जोडून आभार मानले.

यावेळी अमिताभ बच्चन यांनी ब्लॅक कलरची ट्रॅक पँट, पिंक कलरची हुडी आणि कॅप घातली होती. चाहत्यांची ही गर्दी पाहून बिग बी सुद्धा स्वतःला रोखू शकले नाहीत. पायामध्ये चप्पल न घारताच ते जलसा बाहेर पडले आणि त्यांनी चाहत्यांचे आभार मानले. बिग बींना प्रत्यक्षात पाहून त्यांचे चाहते खूपच खूश आणि उत्साहित झाले. या खास प्रसंगी बिग बींची सून ऐश्वर्या राय बच्चन, नातवंड आराध्या बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते.

बिग बींचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ते सध्या रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपती १५' ला होस्ट करत आहेत. बिग बी लवकरच टायगर श्रॉफ आणि कृति सेनॉनच्या आगामी 'गणपथ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT