Akshay Kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiyaa 3: खरंच अक्षय कुमार 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे का?, दिग्दर्शकाने आता स्पष्टपणेच सांगितले...

Akshay Kumar Movie: या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) विद्या बालन (Vidhya Balan) देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. कार्तिकनेच यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत विद्या बालन 'भूल भुलैया 3'मध्ये (Bhool Bhulaiyaa 3) दिसणार असल्याचे कन्फर्म केले आहे.

Priya More

Bhool Bhulaiyaa 3 Movie:

'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa) फ्रँचायझीच्या 'भूल भुलैया 3'च्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या आगामी चित्रपटाबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) दिसणार असल्याची देखील चर्चा सुरू होती.

अशामध्ये आता या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्वत:च या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) विद्या बालन (Vidhya Balan) देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. कार्तिकनेच यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत विद्या बालन 'भूल भुलैया 3'मध्ये (Bhool Bhulaiyaa 3) दिसणार असल्याचे कन्फर्म केले आहे. पण आता अक्षय कुमार या चित्रपटात दिसणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

'भूल भुलैया 3'मध्ये अक्षय कुमार छोट्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून केली जात होती. आता दिग्दर्शकाने मौन सोडून या सर्व अफवांवर आली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय या चित्रपटाचा भाग नसल्याचे अनीस यांनी स्पष्टपणे सांगितले. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात विद्या बालन आणि कार्तिक आर्यन दिसणार आहेत. अनीस यांनी सांगितले की, 'नाही, अक्षय 'भूल भुलैया 3'चा भाग नाही. मी त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, परंतु दुर्दैवाने, मी अशा चित्रपटाची स्क्रिप्ट करू शकलो नाही जिथे आपण एकत्र काम करू शकू.'

'भूल भुलैया 3'च्या शूटिंगचा पहिला दिवस 10 मार्च आहे. कालच विद्या बालन या चित्रपटाचा भाग असणार हे फायनल झाले. अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो विद्यासोबत 'मेरे ढोलना'वर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, 'मंजुलिका 'भूल भुलैया'च्या जगात परत येत आहे. मी विद्याचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. 'भूल भुलैया 3' या दिवाळीत हिट होणार आहे.'

विद्या बालनबद्दल बोलताना अनीस यांनी सांगितले की,'विद्याने माझ्या चित्रपटात तीन दिवसांची भूमिका करण्यास होकार दिला होता. मला आठवतं की, मी तिला कॉल केला होता आणि तिने हो बोलायला वेळ लागला नाही. मला का माहित नाही, पण मी तिचे प्रेमळ हावभाव कधीच विसरू शकत नाही. हे सर्व तिथून सुरू झाले आणि आज मी सेटवर जाण्यासाठी तयार आहे.' दरम्यान, 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये आता अक्षय कुमार या चित्रपटाचा भाग नसल्याचे कळताच त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT