Auron Mein Kahan Dum Tha Release Date Postponed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Auron Mein Kahan Dum Tha : 'कल्की 2898 एडी' च्या यशामुळं नीरज पांडेला लागला दम; थेट रिलीज डेटच बदलली

Auron Mein Kahan Dum Tha Release Date Postponed : आगामी 'औरों में कहां दम था' या बॉलिवूड चित्रपटाचं रिलीज आणखी काहीसं लांबलेलं आहे. नीरज पांडे यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्नेहा ढवळे- साम टीव्ही

आगामी 'औरों में कहां दम था' या बॉलिवूड चित्रपटाचं रिलीज आणखी काहीसं लांबलेलं आहे. नीरज पांडे यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. बॉलिवूड लव्हर्सची मोस्ट फेव्हरेट जोडी अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू या चित्रपटामध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. या दोघांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

खरंतर 'औरों में कहां दम था' हा चित्रपटा ५ जूलैला रिलीज होणार होता. पण तो चित्रपट तेव्हा नं रिलीज होता, जूलैच्या मधल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. अजय- तब्बूच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचं एक महत्वाचं कारण समोर आलं आहे. कारण आहे, तेलगू मल्टीस्टारर सायन्स फिक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी'. ६०० कोटी बजेट असलेला 'कल्की 2898 एडी' चित्रपट रिलीज होऊन आठवडाही नाही उलटला तोच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातलाय.

'कल्की 2898 एडी'चं वर्ल्ड बॉक्स ऑफिस कलेक्शन ४०० करोडच्या घरात गेलंय. प्रभास स्टार 'कल्की 2898 एडी'चं वाढतं यश पाहता लेखक-दिग्दर्शक नीरज पांडेंनी 'औरों में कहां दम था' सावध भूमिका घेतली असावी. कारण सिनेमामागे मेहनत तर लागतेच ना बॉस... तर 'कल्की 2898 एडी'मुळं आपल्या सिनेमाला फटका बसू नये म्हणुन नीरज पांडेंनी आपल्या फिल्मचं रिलीज पुढे ढकलंलंय. असो. आता नीरज पांडेंची हि 'वन स्टेप बॅक' जाण्याच्या स्ट्रॅटर्जीमध्ये किती दम होता हे 'औरों में कहां दम था' च्या रिलीज नंतरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT