Shaitaan Movie Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Box Office Day 3: पहिल्याच विकेंडला पाहायला मिळाली 'शैतान'ची जादू, आतापर्यंतच्या एकूण कमाईचा आकडा किती?

Shaitaan Movie Collection: 'शैतान' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई करत सुरूवात केली. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाला पहिल्या विकेंडचा चांगला फायदा झाला आहे.

Priya More

Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhvan) स्टारर 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला चांगली कमाई केली आहे. विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत असून ते चित्रपटाचे कौतुक करत आहे.

'शैतान' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई करत सुरूवात केली. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाला पहिल्या विकेंडचा चांगला फायदा झाला आहे. शनिवारी आणि रविवारी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केली होती.

अजय देवगणच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14.75 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने उंच उडी घेतली आणि 18.75 कोटींची कमाई केली. यानंतर रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी ‘शैतान’च्या कमाईमध्ये चांगली वाढ झाली. आकडेवारीनुसार, रविवारी या चित्रपटाने 20.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 54 कोटींवर पोहोचली आहे.

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर असं पहिल्यांदा घडत आहे की, एखादा हॉरर चित्रपट अशापद्धतीने कमाई करत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सुट्टीच्या दिवसाचा चांगला फायदा करून घेतला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन सुट्टीचे असल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा झाला. शैतान चित्रपटाच्या समोर दुसरा कोणाताच मोठा चित्रपट नाही. कोणतीही स्पर्धा नसल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT