Agastya Nanda On Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Agastya Nanda On Amitabh Bachchan: 'आजोबा मला सुपरस्टार वाटत नाहीत', अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अगस्त्या नंदा असं का म्हणाला?

Agastya Nanda: नुकताच अगस्त्याने आजोबा अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 'मी त्यांना सुपरस्टार मानत नाही.', असं अगस्त्यने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे अगस्त्या सध्या चर्चेत आला आहे.

Priya More

Superstar Amitabh Bachchan:

बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू म्हणजेच मुलगी श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्या नंदाने (Agastya Nanda) नुकताच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. झोया अख्तरच्या 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये अगस्त्यने शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत काम केले आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून समिश्र प्रतिसाद मिळाला. महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील अगस्त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटापासून अगस्त चांगलाच चर्चेत आहे. नुकताच अगस्त्याने आजोबा अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 'मी त्यांना सुपरस्टार मानत नाही.', असं अगस्त्यने म्हटले आहे.

अगस्त्याने नुकताच फिल्म कम्पॅनियनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आजोबा अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार मानत नसल्याचे मोठं वक्तव्य केले आहे. या मुलाखतीमध्ये अगस्त्या म्हणाला की, 'त्यांनी खूप काही मिळवलं आहे. पण हे विचित्र आहे की मी त्यांना एक सुपरस्टार म्हणून पाहत नाही. मी खरंच माझ्या आजोबांप्रमाणे त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे किती लोकं चाहते आहेत किंवा किती लोकं त्यांच्यासोबतचे फोटो क्लिक करतात याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी ते नेहमीच माझे आजोबा असतील.'

यावेळी अगस्त्या त्याची आई श्वेता नंदाबद्दल देखील बोलला. त्याने सांगितले की, 'तिने नेहमीच मला ग्राउंडेड राहण्याचा सल्ला दिला आहे.' अभिनेत्याने सांगितले की, 'केवळ माझ्या आजोबांमध्येच नाही तर माझ्या आईमध्येही एक अतिशय ग्राउंडेड फॅक्टर आहेत.' सध्या अगस्त्याने आजोबा अमिताभ बच्चन यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.

दरम्यान, अगस्ताच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अगस्त नुकताच 'द आर्चीज' चित्रपटामध्ये दिसला. या चित्रपटातून अगस्त्या , खुशी कपूर आणि सुहाना खान या तिन्ही स्टार किड्सने अभिनयात पदार्पण केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटानंतर अगस्त्य 'इक्किस' चित्रपटातही दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT