Kriti Sanon Gets Golden Visa Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kriti Sanon Gets Golden Visa: क्रिती सेनेनचा युएई सरकारकडून खास गौरव; अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...

Kriti Sanon News: कायमच अभिनय, फॅशन आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिती सेननला UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

Chetan Bodke

Actress Kriti Sanon Granted A Golden Visa

राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (National Award Winner Actress Kriti Sanon) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कायमच अभिनय, फॅशन आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिती सेननला UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. शाहरुख खाननंतर क्रितीला गोल्डन व्हिसा मिळाला. याआधी देखील बऱ्याच बॉलिवूड स्टार्सना हा व्हिसा मिळाला आहे. (Bollywood)

ईसीएच डिजिटलचे सीईओ इक्बाल मार्कोनी यांच्याकडून क्रिती सेननला हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. UAE सरकारकडून मिळणाऱ्या गोल्डन व्हिसासाठी अभिनेत्रीने २०१९ मध्येच प्रक्रियेला सुरूवात केली होती. अखेर अभिनेत्रीला तिचा व्हिसा मिळाला आहे. UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "UAEचा गोल्डन व्हिसा मिळणे हा सन्मान आहे. दुबई देशाप्रती माझ्या मनामध्ये एक विशेष स्थान आहे आणि मी आता त्यांच्या संस्कृतीचा भाग बनण्यास उत्सुक आहे." (Bollywood Actress)

हा व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही यूएईमध्ये अभ्यास, व्यवसाय आणि तिथे राहू सुद्धा शकता. एकूणच यूएईमध्ये जर तुम्हाला वास्तव्य करायचं असेल तर गोल्डन व्हिसा फार महत्त्वाचा आहे. गोल्डन व्हिसा २०१९ पासून सुरु झाला आहे. क्रिती सेननच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना गोल्डन व्हिसा मिळाला आहे. याआधी यूएई सरकारकडून शाहरुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग, कमल हसन, मोहनलाल, दुल्कर सलमान, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, फराह खान, सोनू सूद यांना गोल्डन व्हिसा मिळाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT