Uorfi Javed Debut In Bollywood Saam Tv
मनोरंजन बातम्या

Uorfi Javed ला लागली लॉटरी! Ekata Kapoor च्या चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Uorfi Javed Debut In Bollywood: उर्फी जावेद बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली असून तिच्या हाती चित्रपट लागला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून उर्फी जावेद जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Priya More

Love Sex Aur Dhokha 2 Movie:

अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीच्या माध्यामातून उर्फी जावेदला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हापासून ती आतापर्यंत नेहमीच चर्चेत राहते. उर्फी जावेद आपल्या आगळ्या वेगळ्या ड्रेसिंग स्टाइलच्या माध्यमातून नेहमी जलवा दाखवत असते. यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील झाली. आता उर्फी जावेदबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उर्फी जावेद बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली असून तिच्या हाती चित्रपट लागला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून उर्फी जावेद जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

अभिनेता राजकुमार राव, नुसरत भरुचा स्टारर 'लव्ह सेक्स और झोका' हा चित्रपटात नवीन पिढीसाठी प्रेमाची अनोखी कहाणी होती. आता चर्चा सुरू झाली ती म्हणज'लव्ह सेक्स और धोखा 2' या चित्रपटाची. या चित्रपटामध्ये इंटरनेटच्या जमान्यात प्रेम आणि नात्याची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसणार आहे. उर्फी जावेद या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे कळताच तिचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

बिग बॉस ओटीटी' द्वारे प्रसिद्धी मिळालेल्या उर्फी जावेदने या चित्रपटापूर्वीच कॅमेऱ्यासमोर आपले अप्रतिम अभिनय कौशल्य दाखवले आहे. उर्फी टीव्हीवर सुसंस्कृत सुनेच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाद्वारे उर्फी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाची थीम तिच्या व्यक्तिमत्त्वाशी अगदी जुळून येत असल्याचे बोलले जात आहे.

बालाजी टेलिफिल्म्स आणि कल्ट मुव्हीजचा 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा चित्रपट दिबाकर बॅनर्जी प्रोडक्शनमध्ये तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि तुषार कपूर कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

उर्फी जावेदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'ऐ मेरे हमसफर', 'चंद्र नंदिनी', 'मेरी दुर्गा', 'साथ फेरों की हेरा फेरी', 'बेपनाह', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है','बडे भैया' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. आजकाल उर्फी जावेद फक्त पापाराझींसमोर तिच्या विचित्र आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. आपल्या हटके आणि युनिक ड्रेसिंग स्टाइलचा जलवा ती दाखवत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT