Akshay Kumar And Twinkle Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

50 व्या वर्षी Twinkle Khanna ने पूर्ण केली मास्टर डिग्री, Akshay Kumar चा आनंद गगनात मावेना; म्हणाला - 'मी सुपरवुमनशी...'

Priya More

Twinkle Khanna Completes Graduation:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सध्या चर्चेत आली आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या आयुष्यामध्ये मोठं यश मिळवलं आहे. ट्विंकल खन्नाने वयाच्या ५० व्या वर्षी मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. ट्विंकल खन्नाने लंडन विद्यापीठातून मास्टर डिग्री मिळवली आहे. त्यामुळे अभिनेत्री सध्या खूपच आनंदामध्ये आहे. फक्त ट्विंकलच आनंदामध्ये नाही तर तिचा पती म्हणजेच बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या आनंदालाही पारा उरला नाही. पत्नीच्या यशामुळे अक्षय खूप आनंदित झाला आहे आणि ट्विंकलला तो 'सुपरवुमन' म्हणतो. अक्षय कुमारला ट्विंकलचा खूप अभिमान वाटतो.

अक्षय कुमारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्विंकल खन्नासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या ट्विंकल खन्नाने मास्टर डिग्री मिळवल्यानंतर काळ्या रंगाचा ग्रॅज्युएशन गाऊन परिधान केला आहे. अक्षय आणि ट्विंकल दोघेही आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. अक्षयने आपल्या पत्नीच्या यशाची बातमी मोठ्या उत्साहात चाहत्यांशी शेअर केली. ट्विंकलच्या अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचेही त्यांनी खूप कौतुक ही केले.

अक्षय कुमारने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ट्विंकलसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असे सांगितले तेव्हा मला प्रश्न पडला की तू खरोखरच याबाबत गंभीर आहेस का? पण ज्या दिवशी मी पाहिलं की तू खूप मेहनत करत आहेस. घर आणि करिअरसोबतच तू संपूर्ण विद्यार्थी जीवनही जगत होती हे पाहून आश्चर्य वाटले. मला माहित आहे की मी एका सुपरवुमनशी लग्न केले आहे.'

अक्षयने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी मलाही वाटते की मी अजून थोडा अभ्यास केला असता तर माझ्याकडे जास्त शब्द असले असते आणि मी तुला सांगू शकलो असतो की मला तुझ्यावर किती अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन आणि प्रेम.' अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय आणि ट्विंकलच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत ट्विंकलला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ट्विंकल खन्नाने लंडन विद्यापीठातील गोल्डस्मिथ्समधून फिक्शन लेखनाचा अभ्यास पूर्ण केला आहे. मास्टर डिग्री मिळाल्यामुळे ट्विंकलला प्रचंड आनंद झाला आहे. मागच्या वर्षी ट्विंकलने चाहत्यांना लंडन विद्यापीठाची व्हिडिओ टूर देखील दिली आणि तिचे विद्यार्थी जीवन कसे आहे हे दाखवले होते. विशेष म्हणजे ट्विंकलने तिचा मुलगा आरव ज्या विद्यापीठात शिकतो त्याच विद्यापीठात अर्ज केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT