Twinkle Khanna Bday Celebration Saam TV
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna Bday: ट्विंकल खन्नाने कुटुंबासोबत केलं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, जलपरी होऊन समुद्रात घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; VIDEO व्हायरल

Priya More

Twinkle Khanna 50th Birthday:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) 29 डिसेंबरला म्हणजे आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त ट्विंकल खन्नावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विंकल खन्ना आपल्या कुटुंबासोबत 50 व्या वाढदिवसाचे (Twinkle Khanna Bday) जंगी सेलिब्रेशन करत आहे. अभिनेत्रीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मुलांसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.

ट्विंकल खन्नाने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एक खास मार्ग निवडला आहे. ट्विंकल खन्नाने वाढदिवसाच्या दिवशी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल पती अक्षय कुमार, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबत स्नॉर्कलिंगचा अनुभव घेताना दिसत आहे. हे चौघंही समुद्रामध्ये पोहण्याचा आनंद घेता या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने पोहता पोहता पती अक्षय कुमारला किस केल्याचे दिसत आहे.

ट्विंकल खन्नाने हा व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये एक खास नोट लिहिली आहे. तिने लिहिले की, 'माझ्या 50 व्या वाढदिवसानिमित्त जेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या जगाकडे आणि माझ्या कुटुंबाकडे पाहते तेव्हा माझे डोळे आणि हृदय अजूनही आश्चर्याने भरून येते. लोक महान तत्वज्ञानींचा हवाला देऊ शकतात. पण मी फाइंडिंग निमोच्या धाग्याला फॉलो करते. जीवनामध्ये काहीही येवो, मी सांगेन फक्त पोहत राहा. थरार कधीच संपू नये.'

ट्विंकल खन्नाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहिले की, 'सर्वात प्रेरणादायी आणि सुंदर महिलांपैकी एकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' याशिवाय इतर अनेक यूजर्सनीही तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नाने तिचे चौथे पुस्तक 'वेलकम टू पॅराडाइज' लाँच केले. याआधी तिची 'मिसेस फनीबोन्स', 'द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद', 'पायजमा आर फॉरगिव्हिंग' ही तीन पुस्तकेही लॉन्च झाली आहेत. तिच्या या पुस्तकांना वाचकवर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: आरक्षणासाठी एल्गार! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड, धाराशिव जिल्हा बंद; रविवारी पुणे, परभणी 'जिल्हा बंद'ची हाक

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT