Shilpa Shetty Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

एअरपोर्टवरून ते थेट कारपर्यंत, Shilpa Shetty ची सूटकेस राइड; VIDEO पाहिलात का?

Shilpa Shetty Video: शिल्पा शेट्टी आता पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे (Shilpa Shetty Video) चर्चेत आली आहे. शिल्पाचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सूटकेसवर बसलेली दिसत आहे.

Priya More

Shipla Shetty Suitcase Ride Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. शिल्पाच्या फिटनेस आणि हटक्या ड्रेसिंग स्टाइलचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. महत्वाचे म्हणजे पापाराझी देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये शिल्पा शेट्टीला कैद करण्याची एकही संधी सोडत नाही. अगदी एअरपोर्ट असो, घराबाहेर असो वा स्टुडिओबाहेर शिल्पा शेट्टीला स्पॉट केले जाते. शिल्पा शेट्टी आता पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे (Shilpa Shetty Video) चर्चेत आली आहे. शिल्पाचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सूटकेसवर बसलेली दिसत आहे.

शिल्पा शेट्टी मुंबई एअरपोर्टवर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की शिल्पा शेट्टी आपल्या फॅमिलीसोबत दिसत आहे. शिल्पासोबत तिची मुलगी समिषा, मुलगा विआन आणि आई दिसत आहे. यावेळी शिल्पा शेट्टी मुंबई एअरपोर्टवर उतरल्यानंतर ती थेट तिच्या ट्रॉली बॅगवर बसून बाहेर पडली. ट्रॉली बॅगवर बसलेल्या शिल्पाच्या मांडीवर तिची मुलगी समिषा बसलेली दिसत आहे. एअरपोर्टवरून थेट कारपर्यंत शिल्पा शेट्टी या ट्रॉली बॅगवरच बसून आली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टीच्या मांडीवर मुलीग समिषा बसलली दिसत आहे. शिल्पा आणि तिच्या मुलीने एकसारखीच ड्रेसिंग केली आहे. एखाद्या गाडीप्रमाणे शिल्पाची ट्रॉली बॅग पुढे-पुढे सरकताना दिसत आहे. शिल्पा शेट्टी अनेकदा अशाप्रकारे सूटकेस बॅगवर बूसन आली आहे. तेव्हा ती एकटी असायची पण यावेळी तिच्यसोबत तिची मुलगी समिषा देखील होती.

शिल्पा शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. तिने 1993 मध्ये शाहरुख खान आणि काजोलच्या 'बाजीगर' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. शिल्पा बऱ्या वर्षांच्या ब्रेकनंतर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सुखी' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलिस फोर्स' मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यात शिल्पाशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

SCROLL FOR NEXT