Malaika Arora  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Video: 2024 मध्ये मलायका अरोरा करणार दुसरं लग्न?, फराह खानच्या प्रश्नाला लाजत दिलं उत्तर

Malaika Arora Marriage: मलयाका अरोराने रियलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्ये लग्नाबाबत हिंट दिली आहे. २०२४ मध्ये मलायका अरोरा लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

Malaika Arora And Arjun Kapoor:

बॉलिवूडची (Bollywood) 'मुन्नी' अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत असते. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन सोशल मीडियावर पोस्ट करत नेहमी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत असतात. बॉलिवूडचे सर्वांचे आवडते हे कपल लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशामध्ये आता मलयाकाने रियलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्ये लग्नाबाबत हिंट दिली आहे. २०२४ मध्ये मलायका अरोरा लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मलयाका अरोरा रियलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्ये जज आहे. या शोमध्ये नुकताच बॉलिवूड चित्रपट निर्माती फराह खान आली होती. यावेळी फराह खानने मलायकासोबत खूप मजा-मस्ती केली. यावेळी तिने मलायकाला लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावर मलायकाने देखील लाजत उत्तर दिलं आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फराह खान मलायकाला विचारते की, '२०२४ मध्ये तू सिंगल पॅरेंट्स कम एक्ट्रेसपासून डबल पॅरेंट कम एक्ट्रेस होणार आहे का?' हे ऐकून मलायका फराहला विचारते की, 'म्हणजे, मला कोणाला दत्तक घ्यावे लागेल का?' याचा अर्थ काय आहे? तेव्हा 'झलक दिखला जा 11'ची होस्ट गौहर खान म्हणते की, 'याचा अर्थ असा होतो की तू लग्न करणार आहे का?'

हा प्रश्न ऐकून मलायका अरोरा लाजते आणि उत्तर देते की, 'जर कोणी असेल तर १०० टक्के मी लग्न करेल.' तेव्हा फराह तिला विचारते की, 'कोण आहे म्हणजे? खूप जण आहेत.' तेव्हा मलायका म्हणते की, 'जर कोणी मला लग्नासाठी विचारत असेल तर मी त्याच्यासोबत लग्न करेल.' फराह परत तिला विचारते की, 'कोणी पण विचारले तरी तू लग्न करशील?' यावर मलायका उत्तर देते, 'होय मी लग्न करेल.' अशामध्ये मलायकाने घोषणा केली आहे की, ती २०२४ मध्ये लग्न करू शकते. आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की यावर अर्जुन कपूर नक्की काय उत्तर देईल.

दरम्यान, मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघे आपल्या रिलेशनशीपबद्दल खूपच सिरिअस आहेत. या दोघांनी रिलेशनशीपमध्ये असल्याची घोषणा देखील केली होती. हे दोघे नेहमीच एकत्र फिरताना, पार्टीला जाताना, सुट्ट्या इन्जॉय करताना दिसतात. अशामध्ये मलयाकाचा एक्स हस्बंड अरबाज खानने नुकताच दुसरं लग्न केले. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्न केले. आता अरबाजच्या लग्नानंतर मलायका कधी लग्न करते यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT