Kiara Advani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiara Advani ने 'Don 3'साठी घेतलं तगडं मानधन, रक्कम ऐकून बसलेल 440 व्होल्टचा झटका

Kiara Advani Charged 13 Crore For Don 3: कियारा लवकरच 'डॉन 3' या मोस्ट अवेटेड चित्रपटात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातील कियाराची भूमिका जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Priya More

Don 3 Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांतून आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. अडल्ट, रोमँटिक, हॉरर आणि कॉमेडी चित्रफटानंतर आता ती अॅक्शन चित्रपट करताना दिसणार आहे.

कियारा लवकरच 'डॉन 3' या मोस्ट अवेटेड चित्रपटात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातील कियाराची भूमिका जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सगळ्या दरम्यान, जंगली कॅट म्हणून ओळख असलेल्या कियाराने'डॉन 3' साठी (Don 3 Movie) तकडं मानधन घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. तिने या चित्रपटासाठी किती रक्कम आकारली ते आपण जाणून घेणार आहोत...

'डॉन 3'मध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी या चित्रपटात क्रिती सेनॉनला कास्ट करण्यात आल्या असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण नंतर या चित्रपटामध्ये कियारा अडवाणीची एन्ट्री झाली. या चित्रपटाठी क्रिती सेनॉनचे नाव फायनल करण्यात आले. आता अशाही बातम्या येत आहेत की कियाराने 'डॉन 3'साठी मोठी फी वसूल केली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी फरहान अख्तरच्या चित्रपटासाठी 13 कोटी रुपये इतकी मोठी फी घेत आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला मिळालेली ही सर्वात मोठी फी असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एवढेच नाही तर 'डॉन 3'साठी कियाराची फी तिच्या 'वॉर 2' पेक्षा 50 टक्क्यांनी जास्त असल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

कियारा अडवाणीच्या 'डॉन 3' मध्ये एन्ट्रीची घोषणा फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेत्री रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि कियारा यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कियाराने देखील या फ्रँचायझीमध्ये सहभागी होण्याबद्दल सांगितले होते.

'डॉन 3'मध्ये कियारा अडवाणी आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. फरहान अख्तरचा 'डॉन 3' 2025 साली रिलीज होणार आहे आणि त्याच वर्षी शूटिंगही सुरू होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानला पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी आशा चाहत्यांना वाटत तरी आता या चित्रपटामध्ये शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंग दिसणार आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते नाराज झाले. त्यांनी या चित्रपटामध्ये शाहरुख खानलाच घ्यावे अशी मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT