Katrina Kaif Deepfake: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Deepfake: कतरिना कैफ पुन्हा डीपफेकची शिकार, हृतिक रोशनसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Katrina Kaif And Hrithik Roshan: कतरिना कैफ डीपफेकची शिकार होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील कतरिना कैफचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता व्हायरल झालेल्या कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

Priya More

Katrina Kaif Viral Video:

आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. एआयच्या (AI) मदतीने तयार करण्यात आलेल्या डीपफेक व्हिडीओने (Deepfake Video) बॉलिवूडपासून (Bollywood) साऊथ सेलिब्रिटींचे टेन्शन वाढले आहे. रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), आलिया भट्ट (Alia Bhatt), काजोल (Kajol), नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्यानंतर आता बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे. कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ (Katrina Kaif Deepfake Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना कैफसोबत अभिनेता हृतिक रोशन देखील दिसत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ डीपफेकची शिकार होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील कतरिना कैफचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता व्हायरल झालेल्या कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या डीपफेक व्हिडिओमध्ये कतरिना कैफ अस्खलित तुर्की भाषेत बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका मुलाखतीचा आहे. ज्यामध्ये कतरिनासोबत अभिनेता हृतिक रोशनही दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कतरिना कैफचा हा व्हिडिओ तिच्या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बँग-बँग' चित्रपटादरम्यानचा आहे. हा व्हिडीओ 'बँग-बँग' चित्रपटाचे प्रमोशन करतानाचा आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कतरिनाने एक मुलाखत दिली होती. जी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे डीपफेक म्हणून तयार केली गेली आहे आणि सोशल मीडियावर शेअर केली गेली आहे.

हा डीपफेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर कतरिनाच्या फॅनपेजवरून शेअर केला आहे. १० वर्षे जुना हा व्हिडीओ शेअर करत फॅनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर तू तुर्की भाषेमध्ये बोलत असती तर असे वाटले असते... टीप: हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार करण्यात आला आहे'. कतरिना कैफच्या या डीपफेक व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. एका चाहत्याने कमेंट्स करत लिहिले की, 'अरे देवा, हे तर एकदम तिच्या खऱ्या आवाजासारखे आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हे आश्चर्यकारक आहे. तिचा आवाज फारसा वेगळा नाही.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'हे सर्व खूपच खतरनाक आहे. यावर तात्काळ बंदी घालण्यात आली पाहिजे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT