Kangana Ranaut With A Mystery Man Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौतसोबतचा तो मिस्ट्री मॅन कोण?, अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली - 'एक मुलगा आणि मुलगी...'

Kangana Ranaut On Mistry Man: कंगना रनौतचा मिस्ट्री मॅनसोबतचा हा फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन कंगना रनौतच्या लग्नाच्या आणि ती डेटिंग करत असल्याच्या अफवा रंगल्या होत्या.

Priya More

Kangana Ranaut Insta Post:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आली आहे. ती तिच्या चित्रपट किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली नाही. तर एका मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे कंगना रनौतची चर्चा होत आहे. कंगना रनौतचा मिस्ट्री मॅनसोबतचा हा फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन कंगना रनौतच्या लग्नाच्या आणि ती डेटिंग करत असल्याच्या अफवा रंगल्या होत्या. आता स्वत: कंगना रनौतने या चर्चांनंतर मौन सोडलं आहे. तिने हा मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण हे सांगितले आहे.

अभिनेत्री कंगना रनौत नुकताच मुंबईतील एका सलूनमधून बाहेर पडताना दिसली होती. यावेळी तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅनही होता. हे दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते. पण पापाराझींचा कॅमेरा पाहून कंगना थोडीशी लाजली. त्यानंतर तिचा या मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोंवर जोरदार चर्चा होत आहेत की, हा मिस्ट्री मॅन कोण आहे?, कंगना लग्न करतेय, कंगना मिस्ट्री मॅनला डेट करतेय अशाप्रकारच्या चर्चा सुरू होत्या. आता कंगनाने सर्वांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

कंगना रनौतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर करत नोट लिहिली आहे. या फोटोवर कंगनाने लिहिले की, 'मला मिस्ट्री मॅनबद्दल बरेच कॉल आणि मेसेज येत आहेत. त्याच्यासोबत मी अनेकदा सलूनच्या बाहेर हँग आउट करते. संपूर्ण बॉलीवूड आणि चित्रपट माध्यम कल्पनेत बुडाले आहे. एक मुलगा आणि मुलगी अनेक कारणांमुळे रस्त्यावर एकत्र फिरू शकतात. लैंगिक कारणाशिवाय. तो मित्र असू शकतो, सहकारी असू शकतो, भाऊ-बहीण असू शकते, सोबत काम करणारा मित्र असू शकतो किंवा हेअरस्टायलिस्ट असू शकतो. जो वर्षानुवर्षे सोबत काम करत आहे आणि आता मित्र झाला आहे.'

Kangana Ranaut Post

कंगना रनौतची ही इन्स्टा स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाच्या डेटिंग, लग्नाबाबत ज्या चर्चा सुरू होत्या त्याला पूर्णविराम लागले आहे. दरम्यान, कंगना रनौत लवकरच 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट आणीबाणीच्या काळातील कथा सांगणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT