Jaya Bachchan Again Angry On Paparazzi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan Video: 'आता तू मला शिकवणार..', जया बच्चन यांनी पुन्हा घेतली पापाराझींची शाळा

Jaya Bachchan Again Angry On Paparazzi: जया बच्चन या पापाराझींवर रावतानाचा प्रकार शनिवारी संध्याकाळी आमिर खानची मुलगी आयरा खानच्या ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार्टीत घडला. जया बच्चन या मुलगी श्वेता बच्चनसोबत आल्या होत्या.

Priya More

Jaya Bachchan Schools Paparazzi:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमीच चर्चेत असतात. सतत पापाराझींवर त्या चिडताना दिसतात. जया बच्चन या बॉलिवूडमधील अशा सेलिब्रिटी आहेत ज्यांना फोटो काढायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या नेहमीच पापाराझींसमोर चिडताना दिसतात. पापाराझींवर रागावतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पापाराझींची शाळा घेतली आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जया बच्चन या पापाराझींवर रावतानाचा प्रकार शनिवारी संध्याकाळी आमिर खानची मुलगी आयरा खानच्या ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार्टीत घडला. आयरा आणि नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जया बच्चन या मुलगी श्वेता बच्चनसोबत आल्या होत्या. जया बच्चन पार्टीत दाखल झाल्यानंतर पापाराझींनी त्यांना फोटो काढण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा पारा चढला आणि त्या पापाराझींवर संतापल्या.

आयरा-नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमधील जया बच्चन यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन, श्वेता आणि सोनाली बेंद्रे एकत्र पोज देताना दिसत आहेत. यावेळी पापाराझी जया बच्चन यांना फोटो काढण्यासाठी कशी पोझ द्यावी हे सांगतात. त्यावेळी त्या संतापतात आणि म्हणतात 'तू कोण आहेस? आता तू मला शिकवणार का?'

आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीत जया बच्चन त्यांच्या रेग्युलर मोडमध्ये दिसल्या. त्यांनी पापाराझींना एकदा नाही तर दोनदा फटकारले. पाराझींची शाळा घेतल्यानंतर त्या रागाने त्यांच्याकडे बघून निघून जातात. जया बच्चन यांचा पापाराझींची शाळा घेत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. दरम्यान, हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये देखील जया बच्चन या पापाराझींवर चिडल्या होत्या. पापाराझींना पोझ दिल्यानंतर जया बच्चन त्यांना म्हणाल्या होत्या की, 'ऐवढंही डायरेक्शन देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT