Janhvi Kapoor Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर गुडघे टकवत चढली मंदिराच्या पायऱ्या, VIDEO पाहून चाहत्यांना बसला धक्का

Janhvi Kapoor Climb The Stairs Of Temple On Her Knees: जान्हवी कपूरचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूर गुडघ्यांवर मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

Priya More

Janhvi Kapoor Video:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) जितकी ग्लॅमरस आहे तितकीच ती अध्यात्माशी देखील जोडलेली आहे. बॉलिवूडच्या पार्टींमध्ये स्टायलिश अंदाजमध्ये हजेरी लावून आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी जान्हवी मंदिरामध्ये जाताना मात्र पारंपारिक अंदाजमध्ये दिसते. जान्हवी कपूर नेहमी तिरुपती मंदिरामध्ये (Tirupati Templ) जाऊन दर्शन घेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच जान्हवी कपूरचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूर गुडघ्यांवर मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

जान्हवी कपूरचा तिरुपती बालाजी मंदिराशी आध्यात्मिक संबंध आहे. ती तिरुपती बालाजी मंदिराच्या पायऱ्या गुडघ्यांवर चढली. यावेळी तिच्यासोबत तिची बहीण खुशी कपूर, कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि बेस्ट फ्रेंड ओरी देखील होता. ओरीने याचा व्लॉग तयार केला आहे. या व्लॉगमध्ये जान्हवी कपूरने ती मंदिराच्या पायऱ्या गुडघे टेकवत का चढत आहे यामागचे कारण सांगितले. त्याचसोबत यामागे तिचा काय विश्वास आहे हे सांगितले आहे.

जान्हवी कपूरने ओरीच्या व्लॉगमध्ये खुलासा केला की, 'मी जवळपास 50 वेळा या मंदिराला भेट दिली आहे आणि भगवान बालाजींनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गुडघ्यावर मंदिराच्या पायऱ्या चढल्या आहेत.' जान्हवी अनेकदा मंदिरात जात असते. कधी ती कुटुंबासोबत तर कधी शिखर पहाडियासोबत या मंदिरामध्ये जाते. गेल्या काही महिन्यांत ती अनेक वेळा देवाचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी आली आहे.

जान्हवी कपूर अलीकडेच वडील बोनी कपूर यांच्यासोबत राम चरणच्या हैदराबादच्या घरी गेली होती. RRR फेम अभिनेत्याने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जान्हवी, बोनी आणि राम यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीशी संबंधित इतर लोकही या फोटोमध्ये दिसत होते. अभिनेत्याने फोटो कॅप्शनमध्ये '#RC16 ची वाट पाहत आहे.', असे लिहिले होते.

राम चरण आणि जान्हवी आगामी चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. जान्हवी 'देवारा' या चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. जान्हवीने आता दुसरा तेलुगू चित्रपट साइन केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शिवा शर्मा हत्याकांडातील आरोपी श्रद्धा दुबेसह तिघांना न्यायालयात हजर करणार

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT